Candolim Murder Case | CEO Suchna Seth  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: चोर्लात अडकली अन् निर्दयी ‘सूचना’ फसली

Goa Crime News: पलायन अयशस्‍वी: वाहतूक कोंडी ठरली पोलिसांसाठी फायदेशीर

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: उच्चशिक्षित असलेली संशयित सूचना सेठ (39) हिने आपल्या चार वर्षीय मुलगा चिन्मयची हत्या करून मृतदेह सूटकेसमध्ये (ट्रॉली लगेज बॅग) भरून कॅबमधून ती रविवारी उत्तररात्री एकच्या सुमारास बंगळुरूकडे रवाना झाली. परंतु, तिची वेळ खराब असल्याने सूचना चोर्ला घाटात जवळपास चार तास वाहतूक कोंडीत अडकून पडली व तिथेच तिचा गेम झाला.

त्यामुळे त्यादिवशीचा हा अपघात कळंगुट पोलिसांसाठी एकप्रकारे वरदान ठरला. अन्यथा, ती बंगळुरुला पोहचली असती व तेथून ती अन्यत्र कुठेही गेली असती. शिवाय मृतदेहाची विल्हेवाट लावू शकली असती, असे पोलिस तपासात समोर आले आहे. साधारणतः कॅबने बंगळुरुला पोहचण्यासाठी सुमारे ८ ते १० तास लागतात.

बंगळुरुमधील ‘माईंड फुल एआय लॅब’ या आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनीची सीईओ असलेल्या संशयित सूचना सेठ (३९) हिच्यावर तिच्याच चार वर्षीय मुलगा चिन्मयची निर्दयी हत्या केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी तिला अटक केली असून, तिला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सूचनाने हा खून शांत डोक्याने तसेच पूर्वनियोजन करून केला असावा, यादृष्टीकोनातून पोलिस तपास सुरू आहे. सध्या सूचना पोलिसांना चौकशीत काहीच सांगत नसून आपण चिन्मयचा खून केला नसल्याचा ती दावा करते.

उपलब्ध माहितीनुसार, गेल्या रविवारी उत्तररात्री चोर्ला घाटात ट्रॉली ट्रकचा अपघात झाल्याने या घाटातील वाहतूक खोळंबली होती. परिणामी, सूचना घाटात जवळपास चार तास (रात्रीचे २ ते पहाटेचे सहापर्यंत) अडकून पडली. अन्यथा तिने आधीच बंगळुरु गाठले असते व कळंगुट पोलिसांना तिचा शोध घेणे बरेच मुश्किलीचे बनले असते. यावेळी चोर्ला घाटात कॅब चालक रॉयने सूचनाला गाडी यू-टर्न मारून माघारी जाऊया, असे सूचविले.

कारण, सूचनाने आपणास बंगळुरुला अर्जंट पोहचायचे आहे, असे सांगून कॅब बूक केली होती. मात्र, सूचनाने कॅबमधूनच बंगळुरु गाठूया, असे त्या चालकाला निक्षून सांगितले. शिवाय तिने रॉयला गाडीचे भाडे देऊ केले. मात्र, चालकाने नंतर पैसे द्या, असे म्हटले. त्यानंतर पोलिसांनी सूचनाला चित्रदुर्गमध्ये अर्ध्या वाटेतच ताब्यात घेऊन अटक केली. या घडामोडीत बिचाऱ्या चालकाचे भाड्याचे पैसेही बुडाले. परंतु, हा चोर्ला घाटातील अपघात कळंगुट पोलिसांसाठी एकप्रकारे वरदान ठरला, असे पोलिस सूत्रे सांगतात.

1 सूचना सेठकडून चौकशीत कुठलेही सहकार्य कळंगुट पोलिसांना नाही. तसेच, आपण चिन्मयची हत्या का केली, किंवा अन्यप्रकारे त्याचा मृत्यू झाला का? यापैकी कुठलीच उत्तरे ती पोलिसांना देत नाही.

2 सूचना सेठचा पती वेंकटरामन यांना कळंगुट पोलिस स्थानकात हजर राहण्यासंदर्भात कळंगुट पोलिसांनी समन्स जारी केला आहे. वेंकटारमने पोलिसांनी चिन्मयचे सर्व धार्मिक विधी पार पडल्यानंतर आपण गोव्यात येतो, असे त्यांनी कळंगुट पोलिसांना सांगितले आहे.

3 बुधवारी सूचना सेठ हिची गोमेकॉत फॉरेन्सिक तपासणी झाली. फॉरेन्सिक पथकाने सूचनाची बोटं, नख इतर गोष्टींची चिकित्सा केली गेली.

सिरपच्या बाटल्या मागवल्या

सूचना ही चिन्मयसोबत शनिवारी रात्री सिकेरीमधील गेस्ट हाऊसमध्ये उतरली. त्यानंतर ती रुमबाहेर पडलीच नाही. तिने झोमॅटोवर कॉफी व जेवण मागवले होते. तसेच, दोन बेनाड्रिल कफ सिरपच्या बाटल्या मागवल्या होत्या.

म्हणून उशीने तोंड दाबले ?

६-७ जानेवारीच्या रात्री सूचनाला पती व्यंकटरामन यांचा व्हिडिओ कॉल आला. व्यंकटरामनने मुलाशी बोलायचे असल्याचे सांगितले. परंतु, तिने तो झोपल्याचे सांगितले. खरेतर तो जागाच होता. त्याचा आवाज व्यंटकरामन ऐकेल, अशी भीती तिला वाटत होती. म्हणून तिने मुलाच्या तोंडावर उशी ठेवली. त्यातच मुलाचा मृत्यू झाला. नंतर तिने मनगटाची नस कापून जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याचे समजते.

सूचनाची मनोरूग्णालयात तपासणी

मुलाची हत्या केल्याच्या आरोपावरून अटकेत असलेल्या संशयित सूचना सेठची मंगळवारी मानसिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली. गोवा पोलिसांच्या वतीने सूचनाला बांबोळी येथील मानसोपचार इस्पितळात नेण्यात आले होते.

सेठ यांना येथून जवळच असलेल्या मानसोपचार आणि मानवी वर्तन संस्थेत वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. आम्ही अहवालांची वाट पाहत आहोत. तपासणी नियमित प्रोटोकॉलचा एक भाग होता आरोपीच्या अटकेनंतर तो पाळला जातो, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, सूचना हिला म्हापसा न्यायालयासमोर हजर केले असता, ती सध्या मानसिक तणावाखाली असल्याचा दावा तिच्या वकिलांनी केला. त्यामुळे तिला कमी कोठडी द्यावी याविषयी वैद्यकीय कागदपत्रे सादर करतो, असेही वकिलांनी सांगितले होते.

हत्येमागील तिचा मुख्य उद्देश जाणून घेण्यासाठी सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याच्या पोलिसांच्या मागणीनुसार न्यायालयाने सूचनाला १४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Bike Week 2024: स्टंट, म्युझीक आणि बरंच काही... गोव्यात होणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या बाईक इव्हेंटचे वेळापत्रक प्रसिद्ध

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांची कारवाई! सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT