Regenerative Tourism Model: गोव्यातील 11 आध्यात्मिक स्‍थळांचा विकास साधणार; रोहन खंवटे

आध्यात्मिक, स्वदेशी, सांस्कृतिक, जागरूक पर्यटन आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद या मानकांवर हे धोरण आधारीत असेल - पर्यटनमंत्री
India's first regenerative tourism model | Rohan Khaunte
India's first regenerative tourism model | Rohan KhaunteDainik Gomantak
Published on
Updated on

India's first regenerative tourism model: गोव्यातीलच नव्हे तर देशातील पर्यटनाची दिशा बदलणाऱ्या नवनिर्मित पर्यटनाचे लोकार्पण गोवा पर्यटन खात्यातर्फे करण्यात आले. आध्यात्मिक, स्वदेशी, सांस्कृतिक, जागरूक पर्यटन आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद या मानकांवर हे धोरण आधारीत असेल, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली.

India's first regenerative tourism model | Rohan Khaunte
Utpal Parrikar: मी दिलेले औषध योग्य जागी लागल्यानेच जळजळ

गोव्यातील 11 स्थळे आध्यात्मिक म्‍हणून ओळखली जाणार असून, त्या परिसरातील लोकांशी चर्चा करून हा उपक्रम पुढे नेण्यात येईल. त्‍यास ‘एकादश तीर्थ’ असे नाव दिले आहे. शिवाय उत्तराखंडसोबत सामंजस्य करार केला आहे. उत्तर काशी उत्तराखंडमध्ये आहे तर गोवा ही दक्षिण काशी आहे. या दोन्ही काशींचा मिलाप करणे या मागचा हेतू आहे, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

India's first regenerative tourism model | Rohan Khaunte
Goa News: सासूने मांजरीला मारले म्हणून सुनेने केली पोलिसात तक्रार

दिवाडी येथे झालेल्या लोकार्पण सोहळ्यात खंवटे बोलत होते. यावेळी पर्यटन खात्याचे संचालक सुनील अंचिपका उपस्थित होते. त्‍यांनी 11 आध्यात्मिक स्‍थळांचा विकास साधणार

नवनिर्मित पर्यटनाबद्दल सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

पर्यावरणाचा विकास, सांस्कृतिक संरक्षण, समुदाय सक्षमीकरण यावर भर देण्‍यात येणार आहे. नवनिर्मित पर्यटनासाठी देशातील आदर्श राज्य अशी गोव्याची प्रतिमा बनविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

जनतेचा विकास करताना पर्यावरणाचे जतन करून शाश्‍‍वत पर्यटनाला प्राधान्‍य देणे हा गोवा पर्यटन खात्याचा उद्देश आहे. नवनिर्मित पर्यटन ही काळाची गरज असून यातील वर्तमान आणि भविष्यासाठी समुदाय, अर्थव्यवस्था आणि पर्यावरणाला लाभ होईल, असे खंवटे यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com