Goa Traffic Jam Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic: कळंगुट ते हडफडे मार्गावर वाहतूक कोंडी; न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी गोव्यात पर्यटकांची गर्दी

वाहनधारकांना मनस्ताप, राज्यातील समुद्रकिनारे गजबजले

Akshay Nirmale

Goa Traffic: न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी गोव्यात पर्यटकांची मोठी गर्दी झाली असून त्यामुळेच ठिकठिकाणी वाहतुकदारांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले आहे. विशेषतः समुद्रकिनारे असलेल्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक जात असल्याने या भागात अनेक ठिकाणी ट्रॅफिक जॅमची समस्या उद्भवली आहे. कळंगुट ते हडफडे भागात मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडीचा फटका प्रवाशांना बसला आहे.

Real time traffic google image

नवीन वर्ष दणक्यात साजरे करण्यासाठी देश-विदेशातून अनेक पर्यटक मोठ्या संख्येने गोव्याकडे धाव घेत असतात. यंदाही देशभरातून अनेक पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत. त्यामुळेच आज, वर्षाखेरीदिनी म्हणजेच 31 डिसेंबर रोजी गोव्यातील सर्वच समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी होती. अनेक पर्यटक सहकुटूंब गोव्यात दाखल झाले आहेत.

दरम्यान, सायंकाळी उत्तर गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांच्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. विशेषतः कळंगुट ते हडफडे मार्गावर ट्रॅफिक जॅम झाले होते. त्यामुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

SCROLL FOR NEXT