Goa Traffic Issue  Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic Issue: रायबंदर येथे वाहतूक कोंडी; लोकांना त्रास

Goa Traffic Issue: पणजी स्मार्ट सिटीच्या कामामुळे पणजी शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होत असताना आता रायबंदर येथेदेखील ही समस्या सुरू झाली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Traffic Issue: पणजी स्मार्ट सिटीच्या कामामुळे पणजी शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होत असताना आता रायबंदर येथेदेखील ही समस्या सुरू झाली आहे. सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडीमुळे जुन्या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्यांची गैरसोय होत असून नाराजी व्यक्त केली जात आहे.

स्मार्ट सिटीच्या कामासाठी पणजीप्रमाणे रायबंदर येथेदेखील रस्ते खोदले गेले आहेत. जुना रस्ता अरूंद असल्याने येथे जागा कमी आहे. त्यात दोन्ही बाजूला काम सुरू असल्याने वाहतुकीवर याचा परिणाम होतो.

सकाळी आणि सायंकाळी शाळा, कचेरी वेळ असल्याने वाहतूक जास्त असते. त्यामुळे सतत वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार घडत आहेत.

मुख्य म्हणजे संयम कमी असल्याने कोणीही थांबण्यास तयार नसतो. येथे वाहतूक पोलिस नसल्याने वाहतूक सुरळीतपणे चालणार याची खात्री करून घ्यायला कोणी नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. या सगळ्यात सर्वसामान्यांना त्रास होत आहे.

पणजी-फोंडा महामार्गावरही चिंबल नाक्यावर पुलाचे काम सुरू असल्याने त्या टप्प्यात वाहतूक कोंडी होताना दिसते. यासाठी अनेकजण जुन्या रस्त्यातून जात असल्याने येथे आणखी वाहतूक वाढल्याने वाहतुकीवर ताण वाढला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Municipality: म्हापशातील नोकरभरतीत नियमांचे उल्लंघन! पालिकेतील पदोन्नतीवर प्रश्नचिन्ह, 11 कर्मचाऱ्यांची बढती वादाच्या भोऱ्यात

Goa Bison Attack: गव्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी, पाठीत शिंग खुपसले; स्थानिकांत भीतीचे वातावरण

June Lucky Zodiac Signs: व्यापाऱ्यांना बंपर नफा, तर नोकरदारांना प्रमोशन! जून महिन्यात 6 राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार; पैशांचा होणार पाऊस

Goa Politics: गोवा फॉरवर्ड अजूनही काँग्रेस युतीचा घटक! आमची भूमिका निश्चितपणे मांडू- विजय सरदेसाई

RCB Fans Lathi Charge Video: आरसीबीचा विजय फॅन्सच्या अंगाशी! हुल्लडबाजी नडली, पोलिसांनी काठीनं चोप चोप चोपलं; पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT