Goa Student: वृत्तपत्र वाचनामुळे मुलांचा चौफेर विकास

Goa Student: राजू नायक : पणजीत ‘गोमन्तक स्कॉलर 2023’चे बक्षीस वितरण
Goa Student
Goa StudentDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Student: वृत्तपत्र वाचनाने मुलांची भाषा, लेखनशैलीत सुधारणा होऊन त्यांचा चौफेर विकास होण्यास मदत होते. वृत्तपत्र वाचनामुळे मुलांची वैचारिक, सामाजिक आणि बौद्धिक क्षमताही वाढते. मुले स्पर्धात्मक बनतात, असे मत गोमन्तकचे संपादक-संचालक राजू नायक यांनी व्यक्त केले.

ते ‘गोमन्तक स्कॉलर 2023’ या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात बोलत होते. या स्पर्धेच्या 13 विजेत्यांना स्मार्ट घड्याळ, सायकल आणि क्रिकेट किट अशा स्वरूपातील बक्षिसे प्रदान करण्यात आली.

पणजीत ‘गोमन्तक’ कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास शिक्षण खात्याचे संचालक भगीरथ शेट्ये, ‘गोमन्तक’चे साहाय्यक सरव्यवस्थापक सचिन पोवार, मुख्य वितरण व्यवस्थापक जयदीप पवार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन साहाय्यक व्यवस्थापक (वितरण) भारत पवार यांनी केले.

Goa Student
Goa Tourism: इलेक्ट्रिक सायकल टूर्स ‘लय भारी’; पर्यटकांना भुरळ

नायक म्हणाले, मुलांनी गोमन्तक वृत्तपत्रात पत्रे, निबंध आणि इतर प्रकारचे लिखाण केले पाहिजे. कारण लिखाणामुळे मुलांच्या कल्पकतेत वाढ होते. तसेच आजूबाजूला घडणाऱ्या सामाजिक घटनांची माहिती मिळते.

शिक्षण खात्याचे संचालक भगीरथ शेट्ये यांनी वृत्तपत्रात लिखाण केल्यास मुलांची भाषा सुधारेल आणि वाचनाने ज्ञानात भर पडेल. पुढील शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना वाचन तसेच इतर विविध उपक्रम करावे लागतील. त्यामधून त्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन केले जाणार असल्याचे नमूद केले.

Goa Student
Fraud Case: नोकरीचे आमिष दाखवून युवकाची फसवणूक

‘गोमन्तक स्कॉलर’चे विजेते

‘गोमन्तक स्कॉलर २०२३’ स्पर्धेचे विजेते पुढीलप्रमाणे, स्पर्श नाईक करमली (इयत्ता ८वी), अनुष पुजारी (इयत्ता ३री), आकिब सराफ (इयत्ता ५वी), शिवांश तोरस्कर (इयत्ता ४थी) यांना स्मार्ट वॉच तर देवांग धारगळकर (इयत्ता ८वी), रेहान शेख (इयत्ता ९वी), स्वस्तिक पेडणेकर (इयत्ता ८वी), ध्रुव प्रभू (इयत्ता ६वी) यांना गियर सायकल आणि पायल चोडणकर (इयत्ता ५वी), कार्तिक पाटील (इयत्ता ६वी), प्रजय आवळकर (इयत्ता ९वी), विधी कुर्टीकर (इयत्ता ५वी) आणि पृथ्वीज गावडे (इयत्ता ५वी) यांना क्रिकेट किट बक्षीस म्हणून देण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com