Smart City Panjim Traffic Dainik Gomantak
गोवा

Panaji Smart City: 'पणजी'तील वाहतूक कोंडी गंभीर वळणावर! 'स्मार्ट' उपाययोजनेची गरज

Panjim Smart City Traffic: पणजी बसस्थानक ते पाटो पूल या मार्गावर रोज सकाळी ११.३० वाजेपर्यंत होणारी भीषण वाहतूक कोंडी राज्य सरकारच्या ढिसाळ नियोजनाचे ठळक उदाहरण ठरत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji Smart City Traffic Jam Problem

पणजी: पणजी बसस्थानक ते पाटो पूल या मार्गावर रोज सकाळी ११.३० वाजेपर्यंत होणारी भीषण वाहतूक कोंडी राज्य सरकारच्या ढिसाळ नियोजनाचे ठळक उदाहरण ठरत आहे. पाटो परिसरात सरकारी आणि खासगी कार्यालये मोठ्या प्रमाणात असल्याने कामावर जाणाऱ्यांच्या वाहनांची संख्या मोठी आहे.

त्यामुळे हा रस्ता नेहमीच वाहनांनी गजबजलेला असतो. शिवाय, मळा भागात जाणाऱ्यांसाठी हाच एकमेव मार्ग असल्याने वाहतूक कोंडीची समस्या अधिकच जटिल बनली आहे.

पाटो पुलावरील वाहतूक कोंडी ही एक गंभीर समस्या आहे. या समस्येवर तोडग्यासाठी राज्य सरकारने तातडीने उपाययोजना राबवायला हव्यात. अन्यथा, ही समस्या दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत जाईल. कार्यालयांत जाण्यासाठी, बसस्थानकाकडून येणाऱ्यांची वाहने आणि मळ्याकडे जाणारी वाहने एकच मुख्य मार्ग वापरत असल्याने एकाच ठिकाणी ही कोंडी होते.

मांडवी पूल ओलांडून मळा भागात जाणाऱ्यांसाठी हाच पूल महत्त्वाचा दुवा असल्याने या मार्गावर वाहनांचा ताणही वाढतो. सरकारने प्रभावी उपाययोजना राबविली नाही तर भविष्यात या ठिकाणी वाहतूक कोंडी अधिकच वाढणार असल्याची खात्रीही वाहनचालक व्यक्त करतात.

या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना आपल्या निर्धारित ठिकाणी पोहोचण्यास जास्त वेळ लागतो. त्यातही वाहतूक कोंडीमुळे वाहनांचे इंधन अधिक खर्च होते, वाहतूक कोंडीमुळे वायू प्रदूषण वाढते, वाहतूक कोंडीमुळे लोकांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागते.

काय असू शकतात उपाय!

मळा भागात जाण्यासाठी पर्यायी मार्ग विकसित करणे.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारून खासगी वाहनांचा वापर कमी करणे.

काही कालावधीसाठी एकेरी मार्ग व्यवस्था लागू करून वाहतुकीचे नियोजन करणे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT