Zuari Bridge Dainik Gomantak
गोवा

Zuari Bridge Traffic: झुआरी पुलावरील अपघातामुळे कुठ्ठाळीत चार तास चक्काजाम; नागरिकांचा संताप

वाहतूक कोंडी समस्या कायम; नागरीक संतापले

दैनिक गोमंतक

गोवा राज्यातील अपघातांची मालिका संपायला तयार नाही. प्रतिदिन अपघात, मारामारी, खून, चोऱ्या, वाहतूक समस्या या घटना वाढतायेत. याचा प्रत्यय आज आला असून पणजी ते दक्षिण गोव्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग झुआरी पुलावर दोन चारचाकी धडकल्या. यामुळे कुठ्ठाळीत तब्बल चार तास वाहतूक कोंडी झाली होती.

(Traffic at Cortalim for four hours due to accident on Zuari bridge )

मिळालेल्या माहितीनुसार पणजीपासून सुमारे 15 किमी अंतरावर असलेल्या झुआरी नदीवरील पुलावर आज ( सोमवारी ) सकाळी किरकोळ अपघात झाला. या अपघातात दोन चारचाकी धडकल्याचा प्रकार घडला. विशेष क्रेनच्या सहाय्याने दोन्ही वाहने बाजूला काढण्यापूर्वी 45 मिनिटे वाहतूक राष्ट्रीय पुलावर ठप्प झाली होती. याचा परिणाम म्हणून कुठ्ठाळी मुख्य रस्त्यावर चार तास वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

ट्रॅफिक जाममध्ये अडकलेल्या काही नागरीकांनी आपली विमान उड्डाणे चुकल्याचे म्हटले आहे. तसेच काही प्रवासी आपल्या कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचू शकली नाहीत. तर काही प्रवाशांनी या वाहतूक कोंडीवरुन संताप व्यक्त करत म्हटले की, ही समस्या कायम जाणवू लागली आहे. यावर कायमचा उपाय न योजल्यास आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात अशी भीती ही यावेळी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT