गोवा विधानसभेत ज्या मुद्याने गोवा भाजपला घाम फोडला, त्याच मुद्द्यावरुन गोवा सरकारला आता विरोधक घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण नुकताच 2022 सालचा भारताचा बेरोजगारी दर समोर आला असून या अहवालानुसार गोव्यात बेरोजगारीची प्रमाण देशाच्या तुलनेत अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
(Goa unemployment rate stands at 13 percent )
मिळालेल्या माहितीनुसार भारत सरकारच्या इकॉनॉमिक थिंक टँकने 2022 सालचा बेरोजगारी जाहीर केला आहे. या नुसार भारताचा बेरोजगारी दर 8.1 टक्के आहे. तर गोवा राज्याचा बेरोजगारी दर 13 टक्के असुन देशात आठव्या क्रमांकावर पोहोचले असल्याचे स्पष्ट झाले आहे. या अहवालानुसार सर्वाधिक बेरोजगारी आंध्रप्रदेश राज्यात आहे. यानंतर क्रमश: आसाम, बिहार, छत्तीसगढ, दिल्ली, गोवा, गुजरात या राज्यांचा क्रमांक लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन गोवा फारवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी गोवा सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत बोलताना सरदेसाई म्हणाले की, सरकारने मोठ्या- मोठ्या घोषणा करण्याऐवजी वस्तुस्थिती स्विकारावी.
गोवा राज्यात जॉब फेअर घेणार म्हणून राज्यात जाहिरात केल्या अन् बॅनरबाजी केली. मात्र यामुळे वस्तुस्थिती कोणालाचा नाकारता येणार नाही. असा टोला त्यांनी सरकारला लगावला. मुख्यमंत्र्यांनी आतातरी यातून बोध घ्यावा अन् गोवेकरांसाठी जाहिराती, फोटोबाजी करण्यापेक्षा ध्येयधोरणे यशस्वीपणे राबवावी असा सल्ला देत गोवा सरकारला पुन्हा एकदा फटकारले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.