बनावट नोटा प्रकरण: संशयितांची आयबीकडून चौकशी  
गोवा

fake currency : नकली नोटा खपविण्यासाठी अशिक्षित व्यापारी रडावर; अनेकांना ‘टोपी’

कुडचडेत बनावट नोटांचा सुळसुळाट

दैनिक गोमन्तक

कुडचडे: कुडचडे बाजारात 200 आणि 500 रुपयांच्या नकली नोटांचा सुळसुळाट झाला आहे. तोंडाला कपडा गुंडाळलेली महिला आणि हेल्मेट घातलेल्या एका जोडप्‍याकडून एका गरीब फळविक्रेत्या महिलेला फसवले आहे. फसवण्यासाठी भामट्यांनी बनावट नोटा देऊन गंडा घातल्याचा प्रकार आज कुडचडे बाजारात घडल्याने खळबळ माजली आहे.

(Trader duped by using fake currency at Curchorem)

मिळालेल्या माहितीनुसार कुडचडे येथे फळांची विक्री करणाऱ्या एका महिलेला 500 रुपयांची नोट दिली व 50 रुपयांची फळे घेतली. त्‍याचबरोबर उर्वरित 450 रुपये घेऊन जोडप्‍याने पोबारा केला. त्यामूळे नकली नोटा खपविण्यासाठी गरीब आणि अशिक्षित व्यापाऱ्यांना टार्गेट केले जात असल्याचे चित्र आहे.

हा प्रकार विक्रेत्या महिलेला समजल्यानंतर फळेही गेली आणि पैसेही गेले अशी स्‍थिती महिलेची झालेली आहे. अशाच प्रकारे 200 रुपयांची नकली नोट अन्‍य एका व्यापाऱ्याला देण्‍यात आल्‍याचे आढळून आले आहे. यावरून कुडचडे बाजारात नकली नोटांचा सुळसुळाट झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नागरिकांनी व्यवहार करताना काळजी घेणे आवश्यक आहे. कारण फसवणारे भामटे हे अशीक्षित व्यापारी महिलांना रडावर ठेवत फसवणूक करत आहेत. त्यामूळे फसवणूक झाल्यानंतर दिवसभराची कमाई ही गेली आणि विकलेल्या वस्तुही जातात. आणि यानंतर मात्र हतबल होण्याखेरीज यांच्या हाती काहीच राहात नाही. त्यामूळे पोलिसांनी अशा भामट्यांचा वेळीच बंदोबस्त करणे आवश्यक असून जेमतेम कमाईवर उदरनिर्वाह करणाऱ्या व्यापाऱ्यांची फसवणूक होणे थांबू शकणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

SCROLL FOR NEXT