Goa Carnival 2022 Dainik Gomantak
गोवा

कार्निवलमध्ये स्टॉल्सवर विविध वस्तूंची रेलचेल, पर्यटकांची तुफान गर्दी

आज गोव्यात पणजीमधून 'कार्निवल फेस्टिवल (Viva Carnival 2022)' ची सुरुवात झाली. किंग मोमोने खा..प्या आणि मजा करा..!, असा संदेश देत कार्निवलची मजा लुटण्याचे सर्वांना आवाहन केले.

दैनिक गोमन्तक

Goa Carnival 2022: आज गोव्यात पणजीमधून (Panajim) 'विवा कार्निवल 2022'ची सुरुवात झाली. किंग मोमोने खा..प्या आणि मजा करा..!, असा संदेश देत कार्निवलची मजा लुटण्याचे सर्वांना आवाहन केले. (Tourists thronged the carnival)

मीरामार बीचवरील स्टॉल्सवर विविध वस्तूंची रेलचेल...

मीरामार (Miramar) बीचवर खाद्यपदार्थांचे आणि विविध वस्तूंचे स्टॉल पहायला मिळाले. या स्टॉल्सवर चमचमीत पदार्थ, कपडे, दागिने, फुलझाडे, घरगुती लोणचे, खाऊ त्याचबरोबर शोभेच्या वस्तू आणि गृहोपयोगी वस्तू पाहायला मिळाल्या. सांबा स्केअरप्रमाणेच मिरामार बीचवरील स्टॉल्सवरही पर्यटकांनी गर्दी केली होती.

सांबा स्केअर परिसरात पर्यटकांची गर्दी...

सांबा स्क्वेअर परिसर हा फेस्टिवलचा एक महत्त्वाचा भाग आहे. कार्निवलची सुरुवात झाल्यानंतर सांबा स्क्वेअरवर पर्यटकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. कर्णकर्कश्श संगीतात हजारो पर्यटक आनंद कार्निव्हलचा आनंद लुटण्यासाठी उपस्थित होते. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनीच तिथे प्रचंड गर्दी केली होती. अगदी उभे राहायला जागा नसूनही नव्याने लोक तिथे येतच होते.

दरम्यान, वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर आधारित चित्ररथ आज पहायला मिळाले. पर्यावरण, आरोग्य गोव्याची कला-संस्कृती, खाद्यसंस्कृती, निसर्ग अशा सर्वच विषयांवर आधारित हे चित्ररथ होते. पर्यावरण जतन करण्याचा संदेश देत, गोव्याची कला संस्कृती सादर करत, पारंपरिक संगीत आणि नृत्य सादर करत, त्याचबरोबर आरोग्याबाबत जनजागृती करत हे चित्ररथ पुढे जात होते. फक्त राज्यातलेच नव्हे तर देशभरातले आणि परदेशातले पर्यटक कार्निवलचा आनंद लुटत होते.

खरं तर मागील दोन वर्षांमध्ये कोरोनामुळे कार्निवलवर विरजण पडले होते. पण यंदा रुग्णसंख्या ओसरल्यामुळे धुमधडाक्यात फेस्टिवलची सुरुवात या वर्षी करण्यात आली आहे. यामुळे राज्यात नव्याने चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025: IND vs PAK मॅच होणार नाही! आशिया कपमधून पाकिस्तान 'आऊट', आता 'या' देशाच्या संघाला मिळणार संधी

Viral Video: लहान मुलांना वाचविण्यासाठी जर्मन शेफर्डने बाल्कनीतून घेतली उडी; पाहा व्हिडिओ

Budget Friendly India Tour: दिल्ली, गोवा, जयपूर...14 दिवसांत भारत दर्शन; कसा कराल बजेटफ्रेन्डली प्रवास? वाचा प्लॅन

Viral Video: "असले मित्र नको रे बाबा!" धोकादायक मस्करीचा व्हिडिओ व्हायरल; त्याची 'ही' अवस्था पाहून नेटकरी संतप्त

Operation Sindoor: पाकिस्तानच्या ‘पळपुट्या' नौदलाची पोलखोल! ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान नौका ग्वादर बंदरात लपवल्या; सॅटेलाईट फोटोंमधून खुलासा

SCROLL FOR NEXT