Tourista Renamed places in goa  Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: 'दिल चाहता है' किल्ला ते 'डिअर जिंदगी' रोड... गोव्यातील पर्यटनस्थळांची अशी बदलली नावे!

चित्रपटांमध्ये दाखवलेल्या गोव्यातील काही ठिकाणांना खास भेट देण्यासाठी म्हणून अनेकजण इथे येत असतात.

Kavya Powar

Tourist Places in Goa : गोवा हे एकमेव असे ठिकाण आहे जिथे पर्यटक तर येतातच शिवाय बॉलीवूडमधील अनेक दिग्दर्शकही इथे आपल्या चित्रपटांचे चित्रीकरण करण्यासाठी येत असतात. अनेक सिनेकलाकरांचे गोवा हे एक आवडते स्थळ आहे.

चित्रपटांमध्ये दाखवलेल्या गोव्यातील काही ठिकाणांना खास भेट देण्यासाठी म्हणून अनेकजण इथे येत असतात.

बॉलीवूडचे अनेक चित्रपट आल्यानंतर गोव्यात येऊन त्या संबंधित ठिकाणांची चौकशी करताना पर्यटक दिसतात. जसे की पर्रा रोड पर्यटकांचे आवडते ठिकाण बनले. आणि त्यानंतर हळूहळू 'डिअर जिंदगी रोड कुठे आहे? असे विचारणाऱ्यांची संख्या वाढताना दिसली.

आता बॉलीवूडमध्ये चित्रित झालेली गोव्यातील अशी अनेक ठिकाणे आहेत ज्याला गोव्यावर प्रेम करणाऱ्या अनेक पर्यटकांनी वेगळी नावे दिली आहेत. चला तर अशी ठिकाणे आणि पर्यटकांचे त्या ठिकाणाशी असलेले नाते पाहूया.

  • दोना पावला जेट्टी (सिंघम पॉइंट)

दोना पावला जेट्टी हे ठिकाण बॉलीवूडच्या सिंघम, एक दुजे के लिये अशा अनेक सिनेमांमध्ये चित्रित केलेले आहे. सिंघम चित्रपटात याठिकाणी दखवलेले फाईट सीन पाहिल्यानंतर गोव्यात येणाऱ्या देशी पर्यटकांनी या जेट्टीला भेट द्यायला सुरुवात केली.

भलेही याठिकाणाची ओळख दोना पावला जेट्टी असली तरी पर्यटकांनी त्यांना सिंघम पॉइंट असे नाव दिले. मजेशीर गोष्ट म्हणजे जेट्टीवर एक चहाचा स्टॉल आहे ज्याचे नाव सिंघम आहे. आणि अशाचप्रकारे दोना पावला जेट्टी ठिकाण बनले सिंघम पॉइंट.

Dona Paula Jetty | Singham Point
  • पर्रा रोड (डिअर जिंदगी रोड)

डिअर जिंदगी या चित्रपटाचे बरेचसे शूटिंग गोव्यात झालेले आहे. म्हापसामध्ये असलेल्या पर्रा रोडवर शूट झालेला चित्रपटाचा सीन प्रेक्षकांचा आवडता भाग बनला आणि फक्त हा रस्ता पाहण्यासाठी अनेकांनी इथे गर्दी करायला सुरुवात केली.

दोन्ही बाजूंनी ताडाची झाडे असलेला हा रस्ता गिरी आणि पर्रा या दोन गावांना जोडतो आणि स्थानिक लोक त्याचा नियमित वापर करतात. बघता बघता हा रस्ता कधी इथलं एक पर्यटन स्थळ बनलं हेच कळल नाही. आता याला पर्रा रोड न म्हणता अनेकजण 'डिअर जिंदगी रोड'च म्हणताना दिसतात.

Parra Road | Dear Zindagi Road
  • शापोरा किल्ला (दिल चाहता है किल्ला)

2001 मध्ये आलेला आयकॉनिक सिनेमा ‘दिल चाहता है’, ज्या सिनेमाने तरुणाईमध्ये भलतीच क्रेझ निर्माण केली. याचे चित्रीकरणही गोव्यात झाले. गोव्यातील शापोरा किल्ल्यावर चित्रित झालेला चित्रपटाचा भाग आजही प्रेक्षकांच्या काळजात घर करून आहे.

1600 मध्ये आदिल शाहने बांधलेला हा किल्ला गोव्याच्या अभूतपूर्व निसर्गाची साक्षच देतो. किल्ल्याच्या तटबंदीजवळ बसून सिनेमातल्या मुख्य पात्रांमधील संवाद इथे भेट देणाऱ्या प्रत्येकाला आजही ऐकू येत असतात.

गोव्याच्या नकाशावर शापोरा किल्ला म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण दिल चाहता है किल्ला म्हणूनही प्रचलित झाले आहे. देशी पर्यटक, मित्र-मैत्रिणी आपल्या ग्रुपसह जेव्हा गोव्यात फिरायला येतात तेव्हा इथे आवर्जून भेट देतात.

Chapora Fort | Dil Chahta Hai Fort
  • जुने जीएमसी कॉम्प्लेक्स (गोलमाल कॉम्प्लेक्स)

धमाल, मजामस्ती आणि पैसा वसूल चित्रपट म्हणजे रोहित शेट्टी दिग्दर्शित गोलमाल. या संपूर्ण चित्रपट सिरिजचे जवळजवळ 90% शूटिंग हे गोव्यातच झाले आहे. चित्रपटात तुम्ही गोव्यातील अनेक ठिकाणे पाहू शकता.

याचे एक कारण म्हणजे दिग्दर्शक रोहित शेट्टी एक मुलाखतीमध्ये म्हणाला होता की, गोवा हे त्याचे एक आवडते ठिकाण आहे, इथे काम करायला समाधान आणि मजा येते, त्यामुळे गोलमालच्या चारही भागांचे बहुतांश शूटिंग हे इथेच करण्यात आले.

याचाच प्रत्यय म्हणजे चित्रपटात दाखवण्यात आलेले एक ठिकाण, जुने GMC कॉम्प्लेक्स हे आता गोलमाल कॉम्प्लेक्स म्हणून ओळखले जाते. पणजीमध्ये आलेले पर्यटक आवर्जून इथे फोटो काढताना दिसतात. हेच ठिकाण अजय देवगणच्या सिंघम चित्रपटातही वापरण्यात आले होते.

Old GMC Complex| Golmaal Complex

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

Kala Academy: चूक मान्य करा, कामाला लागा!

Goa Accident: गोव्यात नऊ महिन्यात 209 अपघात, तरीही 10 टक्क्यांची घट; 'हे' आहे मुख्‍य कारणं

SCROLL FOR NEXT