Goa Taxi Operator Protest Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi Operator: गोव्यात टॅक्सी आंदोलक पुन्हा आक्रमक; अटकेची मागणी होत असलेला पराग रायकर कोण?

Goa Taxi Operator Protest: गोव्‍यातील पर्यटक टॅक्‍सी चालकांची बदनामी केल्‍याचा आरोप करून खासगी टूर ऑपरेटर्स यांचे प्रश्‍न घेऊन लढणारे पराग रायकर यांना अटक करा.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Taxi Operator Protest

कोलवा: गोव्‍यातील पर्यटक टॅक्‍सी चालकांची बदनामी केल्‍याचा आरोप करून खासगी टूर ऑपरेटर्स यांचे प्रश्‍न घेऊन लढणारे पराग रायकर यांना अटक करा, अशी मागणी घेऊन शेकडो टॅक्‍सीचालक कोलवा पोलिस स्‍टेशनवर चाल करुन गेले. केळशीचे सरपंच डिक्‍सन वाझ हेही त्‍यांच्‍याबरोबर होते.

पर्यटक टॅक्‍सी चालक पर्यटकांना लुटतात, असा आरोप करून रायकर यांनी समाजमाध्‍यमांवरून एक व्‍हिडिओ प्रसारित केला होता. त्‍यात त्‍यांनी टॅक्‍सीचालक हे दारूडे आहेत, असा आराेप केला हाेता. यामुळे आपली बदनामी झाली आहे.

यामुळे तत्‍काळ रायकर यांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद करुन त्‍यांना अटक करा, अशी मागणी यावेळी करण्‍यात आली. यावेळी वार्का, बाणावली आणि केळशी येथील सरपंचांबरोबर उत्तर आणि दक्षिण गोव्‍यातील टॅक्‍सी चालक पाेलीस स्‍थानकावर जमा झाले होते.

रायकर यांच्‍या या आरोपामुळे टॅक्‍सी चालक बदनाम झाले असून या बदनामीचा परिणाम आमच्‍या टॅक्सीच्या व्‍यवसायावर होऊ शकतो, असा दावा करून रायकर यांच्‍या विरोधात कडक कारवाई क़रावी,अशी मागणी यावेळी टॅक्सी व्यावसायिकांकडून करण्‍यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AFC Champions League 2: एफसी गोवाचा कडू शेवट! 2025 चे मैदान पराभवाने गाजले; आता भारतीय फुटबॉलचे भविष्यही अधांतरी

Vasco Market: मुरगाव पालिकेच्या नियमांना हरताळ, वास्को मार्केट बनलं 'अडथळ्यांचं आगर'; कारवाईच्या इशाऱ्यानंतरही विक्रेत्यांची दादागिरी सुरुच

Dabolim Airport Touts: गुपचूप प्लॅन, धडाकेबाज ॲक्शन! दाबोळी विमानतळावर 20 दलालांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; पळणाऱ्यांची धरपकड सुरु

Goa Shellfish Shortage: बेतूलच्या मच्छीमारांवर उपासमारीची टांगती तलवार! साळ नदीतील गाळ ठरतोय 'शेल फिश'साठी कर्दनकाळ

Goa Crime: एका क्षणाचा राग अन् संसाराची राखरांगोळी! नवऱ्याशी भांडण होताच बायकोनं संपवली जीवनयात्रा; धक्कादायक घटनेनं हादरलं सांकवाळ

SCROLL FOR NEXT