Goa Vs Bali Tourism Expense Comparison Dainik Gomantak
गोवा

Goa Vs Bali: एक लाखाचं बजेट! गोवा, बाली का थायलंड? पर्यटक कुठे जायला देतायेत पसंती?

Goa Tourism: नव्याने समोर आलेल्या आकडेवारीनुसार गोवा टूर एवढ्याच खर्चात किंवा थोडे अधिक बजेट असल्यास बाली, फुकेट सारख्या ठिकाणची टूर करण्याची संधी मिळतेय.

Pramod Yadav

पणजी: गोवा फिरण्यासाठी येणाऱ्या खर्चात जर आंतरराष्ट्रीय ठिकाण बाली, बँगकॉक, फुकेट सारख्या ठिकाणी फिरता आलं तर तुम्ही कुठे जाणं पसंत कराल? निश्चितच गोव्याला जाता येईल कधीही, आधी आंतरराष्ट्रीय ठिकाणी जाऊन येऊ, असा विचार मनात येईल. डिसेंबर संपायला अवघे ८-१० दिवस उरलेत. अनेकजण फिरण्यासाठी विविध प्लॅन करतायेत. पण, दरवर्षी पर्यटकांच्या हॉट लिस्टवर असणारा गोवा लोकांच्या पसंतीत मागं पडताना दिसत आहे.

गोव्याच्या पर्यटनावरुन गेल्या दोन महिन्यात सोशल मिडियावर बराच कथ्याकूट झाला. राज्यातील अनेक गौरसोई, महागड्या सुविधा आणि वाढत्या प्रदूषणावर पर्यटकांनी बोट ठेवत गोव्याकडे पाठ फिरवल्याचे मत मांडले. आता नव्याने समोर आलेल्या आकडेवारीनुसार गोवा टूर एवढ्याच खर्चात किंवा थोडे अधिक बजेट असल्यास बाली, फुकेट सारख्या ठिकाणची टूर करण्याची संधी मिळतेय.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ७ ते १० टक्के जास्त नागरिकांनी आंतरराष्ट्रीय ठिकाणच्या पर्यटनासाठी अधिक चौकशी केल्याचे 'पीक युवर ट्रेल' या कंपनीने म्हटले आहे. पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणांसाठी किफातशीर प्रवास, व्हिसा फ्री प्रवेश आणि काही विशेष सवलती देण्यात आल्यात, असेही निरिक्षण कंपनीने नोंदवले आहे. अगोदा कंपनीच्या ट्रव्हल लिस्टमध्ये फुकेट, बँककॉक, पटाया, दुबई आणि बाली ही आंतरराष्ट्रीय पर्यटन ठिकाणे टॉपवर आहेत. स्थानिक पर्यटनस्थळांच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय ठिकाणांसाठी अधिक पसंती दिली जात असल्याचे कंपनीने म्हटलंय.

गोवा आणि बाली खर्चाची तुलना

Delhi To Goa

दिल्लीतून गोव्याला जाण्यासाठी सहा ते दहा हजार रुपये प्रवास खर्च येतो. येथे थ्री स्टार हॉटेलमध्ये मुक्काम केल्यास एका रात्रीसाठी आठ ते १२ हजार रुपये (सहा रात्रीसाठी ४८ ते ७२ हजार रुपये), खाद्यपदार्थांवर दिवसाला दोन ते तीन हजार रुपये (आठवड्याला १४ ते २१ हजार रुपये), यासह प्रवास आणि इतर खर्च धरल्यास आठवड्याच्या गोवा ट्रीपसाठी ८० हजार ते १ लाख १० हजार रुपये खर्च येऊ शकतो.

Bangalore To Bali

तसेच, बंगळुरु येथून बालीला फ्लाईटने जाण्यासाठी ३५ ते ५० हजार रुपये प्रवास खर्च येतो. थ्री स्टार हॉटेलमध्ये राहण्यासाठी सहा ते सात हजार रुपये आणि खाद्यपदार्थांवर आठवड्याला साडे पाच ते साडे सहा हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. बालीतील प्रवास आणि इतर खर्च पाहता येथील ट्रीप १ लाख पाच हजार ते १ लाख २५ हजार रुपये खर्च येऊ शकतो.

Coorg And Thailand

तसेच, कूर्गच्या तुलनेत थायलंड स्वस्त असल्याचे आकडेवारीतून दिसून येते. थायलंडमध्ये एका रात्रीचा मुक्काम सात ते नऊ हजार रुपये येऊ शकतो तर कूर्गमध्ये १५ ते २० हजार रुपये खर्च येतो.

राजस्थान, जयपूर, जोधपूर आणि उदयपूर येथे ५ रात्री आणि सहा दिवसाचा प्रवास आणि राहण्याचा खर्च ७६ हजार रुपये येऊ शकतो. या तुलनेत थायलंडमध्ये तीन रात्री आणि चार दिवसांसाठी प्रवास आणि राहण्याचा एकूण खर्च ५३ हजार रुपयेपर्यंत येऊ शकतो.

व्हिसा फ्री किंवी व्हिसा ऑन अरायव्हल सारखे पर्याय भारतीयांसाठी आंतरराष्ट्रीय प्रवास सुलभ करतायेत. थायलंड, इंडोनेशिया, मालदीव, श्रीलंका यासारखे देश भारतीय नागरिकांना व्हिसा ऑन अरायव्हल सारखी सुविधा देतात. भारतीय जगातील ६२ देशांमध्ये विना व्हिसा प्रवास करु शकतात. मलेशियासह इतर देशांनी भारतीयांसाठी सवलतीच्या दरातील टूर पॅकेज उपलब्ध करुन दिले आहेत, असे निरिक्षण ट्रॅव्हल बुकिंग कंपन्यांनी नोंदवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT