Morjim Dainik Gomantak
गोवा

Morjim: मोरजी समुद्रात बुडून देशी पर्यटकाचा मृत्यू, दोन दिवसात दुसरी घटना

दोन दिवसांत समुद्रात बुडण्याच्या दोन घटना घडल्या आहेत.

Pramod Yadav

Morjim: मोरजी समुद्रात बुडून एका देशी पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बुडालेल्या व्यक्ती देशी पर्यटक अथवा कामगार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दोन दिवसांत समुद्रात बुडण्याच्या दोन घटना घडल्या आहेत, शुक्रवारी दिल्लीतील एक पर्यटक वागातोर येथे बुडाला होता.

दिल्लीतील तरुणाचा वागातोर येथे बुडून मृत्यू

वागातोर समुद्रकिनारी पाण्यात उतरलेल्या जीवन दत्ता (वय ३२, दिल्ली) या तरुणाचा काल बुडून मृत्यू झाला. जीवन हा वागातोर येथील 'मिस मार्गारिटा' रिसॉर्टमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करीत होता. आपल्या इतर दोन सहकाऱ्यांसोबत तो समुद्रात गेला होता व गटांगळ्या खाऊ लागला.

त्याच्या सहकाऱ्यांनी आरडाओरड केल्यानंतर तेथे असलेल्या एका विदेशी पर्यटकाने त्याला पाण्यातून बाहेर काढले. नंतर त्याला एका खासगी इस्पितळात दाखल केले, परंतु तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

SCROLL FOR NEXT