Tourist Death due to negligence Dainik Gomantak
गोवा

हलगर्जीपणामुळेच जयपूरच्या पर्यटकाचा मृत्यू : स्थानिकांचा आरोप

कोलवा किनाऱ्याच्या सौंदर्यीकरणाचे काम कंत्राटदाराने अर्धवट सोडून देताना भूमिगत वीजवाहिनीबद्दल योग्य ते खबरदारी न घेतल्याचा आरोप सध्या होत आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव : कोलवा किनाऱ्याच्या सौंदर्यीकरणाचे काम कंत्राटदाराने अर्धवट सोडून देताना भूमिगत वीजवाहिनीबद्दल योग्य ते खबरदारी न घेतल्याचा आरोप सध्या होत आहे. त्यामुळेच जयपूर येथील उमाशंकर शर्मा (40) या पर्यटकाचा जीव गेला, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

किनाऱ्यावर जे सौंदर्यीकरणाचे काम केले होते, त्यावेळी भूमिगत वाहिनी घातली होती. ती जागा व्यवस्थित बंद न करता तशीच सोडून दिली होती. तिथेच काल रात्री जीवंत वीज तारेवर पाय पडल्याने शर्मा यांचा मृत्यू झाला. काल शुक्रवारी उत्तरीय तपासणी झाल्यानंतर मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला.

ही घटना घडल्यानंतर काल शुक्रवारी बाणावलीचे आमदार वेंझी व्हिएगस यांनी या जागेची पाहणी केली असता, हे काम अर्धवट सोडून दिल्याने येथील वीज यंत्रणेचा ताबा अजून वीज खात्याकडे दिला नसल्याची माहिती पुढे आली. यासंबंधी आवश्यक ते सुरक्षेचे उपाय त्वरित योजा, अशा सूचना व्हिएगस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.

स्थानिक व्यावसायिकांनी या मृत्यूस पर्यटन खात्याचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करत पर्यटकांना अशा दुर्घटनांना सामोरे जावे लागल्यास या किनाऱ्यावर कुणीही येणार नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मतचोरी करून पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न" प्रियांका गांधी-वद्रा यांची 'NDA'वर टीका; 65 लाख नावे वगळल्याचा आरोप

Department of Animal Husbandry: पशुसंवर्धन खाते प्रमुखांविना ठप्प, कामधेनू सुधारित योजनेसह अनेक योजना प्रभावित

Goa Today's News Live: बांबोळीत पुन्हा अपघात, दुभाजकाला धडकली बस

Horoscope: आजचा दिवस 'गोल्डन'! गुरुवारी 'या' 3 राशींच्या नशिबाचे दरवाजे उघडणार, परिश्रमाचे उत्तम फळ मिळणार

Night Vigil App: तंत्रज्ञानामुळे रात्रीची सुरक्षा होणार अधिक सक्षम, विद्यार्थ्यांनी बनवलेले 'नाईट व्हिजिल' ॲप पोलिसांसाठी नवे हत्‍यार

SCROLL FOR NEXT