Tourist in Goa Dainik Gomantak
गोवा

पर्यटकांची पावले वळली दक्षिण गोव्याकडे

दुकानांवर खरेदीसाठी गर्दी, कोरोनाची तिसरी लाट ओसरल्याचा परिणाम

दैनिक गोमन्तक

मडगाव : राज्यात देशी पर्यटक दाखल होऊ लागले असून दक्षिण गोव्यातील कोलवा, बाणावली, वार्का, सुरावलीसह इतर समुद्रकिनाऱ्यांवर या पर्यटकांची रेलचेल दिसून येत आहे. त्यामुळे येथील व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. (Tourist in Goa News Updates)

कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात हे समुद्र किनारे पर्यटक नसल्याने सुनेसुने झाले होते. त्यानंतर काहीसे कोरोनाचे सावट कमी झाल्याने डिसेंबर 2021 मध्ये नवे वर्ष साजरे करण्यासाठी अनेक पर्यटक दाखल झाले होते. जानेवारी 2022 वर्षाच्या मध्यावर तिसऱ्या लाटेचे गोव्यात (Goa) आगमन झाल्याने पुन्हा पर्यटकांनी गोव्याकडे पाठ फिरविली होती. तसेच राज्यात विधानसभेच्या निवडणूक असल्यानेही पर्यटकांच्या संख्येवर परिणाम झाला होता. आता पुन्हा पर्यटक किनाऱ्यांवर दाखल होत असल्याने येथील व्यावसायिकांनीही समाधान व्यक्त केले आहे.

रेडिमेड कपडे आणि स्थानिक वस्तूंची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनीही याबाबत समाधान व्यक्त केलं आहे. कोरोनामुळे (Corona) येथील व्यवसाय ठप्प होता. मागील दीड वर्षे पर्यटक नसल्याने नुकसानात दिवस काढावे लागले होते. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यानंतर पर्यटक येत असून हळूहळू येथील व्यवसायात जम बसत आहे, असं व्यावसायिकांनी स्पष्ट केलं आहे.

कोरोनाच्या काळात पर्यटक (Tourist) नसल्याने व्यवसायाअभावी जगणे कठीण झाले होते. गाडी बँकेकडून कर्जावर घेतली आहे. पण पर्यटक नसल्याने बँकेचे हफ्ते थकले होते. आता स्थिती सुधारत असून देशी तसेच विदेशी पर्यटकांमुळे काही प्रमाणात व्यवसायास सुरुवात झाली आहे. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये समाधान असल्याचं खासगी टॅक्सी चालकांचं म्हणणं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT