Mapusa Bus Stand Dainik Gomantak
गोवा

Mapusa Goa: Music बंद करायला सांगितले म्हणून अश्लील शिवीगाळ, म्हापशात पर्यटकाला महिलांनी दिला बेदम चोप

Mapusa Crime News: महिलांनी व्हिडिओच्या माध्यमातून केलेल्या आरोपांनुसार, पर्यटकांनी त्यांना अश्लील शिवीगाळ केली.

Pramod Yadav

म्हापसा: महिलांना अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी एका पर्यटकाला बेदम चोप दिल्याची घटना म्हापशात घडली आहे. बसमध्ये असताना संगीत बंद करायला सांगितल्याने पर्यटकांनी महिलांना अश्लील शिवीगाळ केली. दरम्यान, बसमधून खाली उतरल्यानंतर महिलांनी या पर्यटकाला बेदम चोप दिला.

महिलांनी पर्यटकाला चोप दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यात महिला पर्यटकाला चोप देताना दिसत आहेत. त्याच्या अंगावरील कपडे फाडण्यात आल्याचे व्हिडिओत दिसत आहे. पर्यटक दारुच्या नशेत असल्याचा देखील काही जणांनी दावा केला आहे. महिलांनी व्हिडिओच्या माध्यमातून केलेल्या आरोपांनुसार, पर्यटकांनी त्यांना अश्लील शिवीगाळ केली.

बसप्रवासात असताना संबधित पर्यटकाला संगीताचा आवाज कमी करण्याची विनंती महिलांनी केली. दरम्यान, पर्यटकाने महिलांना अश्लील शिवीगाळ केली, असा आरोप महिलांनी केला. समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, घटनेची माहिती पोलिसांना दिली असून, घटनेची दखल घेऊन योग्य कारवाई करण्याची मागणी महिलांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT