Rohan Khaunte  Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism : पर्यटन प्रकल्पांची कामे 2017 पासून प्रलंबित

रोहन खंवटेची माहिती; महसूलवाढीवर विपरीत परिणाम झाल्याचंही स्पष्टीकरण

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Tourism : पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी गोवा पर्यटन विकास महामंडळाची बैठक घेतली. या बैठकीत पर्यटन प्रकल्पांचा आणि विकासकामांचा आढावा घेण्यात आला. पर्यटन खात्‍याची काही विकासकामे विभागीय मंजुरी मिळणे प्रलंबित असल्‍याने 2017 पासून रखडली आहेत. याचबरोबर इतर समस्यांमुळे विकास प्रकल्पांची कामे पूर्ण झालेली नाहीत. यामुळे सरकारला नुकसान सहन करावे लागत असून महसूलवाढीवर परिणाम होत असल्‍याचे मंत्री खंवटे यांनी सांगितले.

पर्यटन विकास महामंडळाने हॉटेल प्रकल्पांसाठी करार केले होते. महामंडळाकडून हे प्रकल्‍प पूर्ण होत नसतील तर हे करार रद्द करावे लागतील, असा इशारा मंत्र्यांनी दिला. तसेच या प्रकल्‍पांची नव्याने सुरुवात करावी लागेल, असेही त्‍यांनी सांगितले. संबंधित खात्‍यांकडून आवश्यक परवानगी न मिळाल्यामुळे प्रकल्पांना उशीर झाला असेल किंवा इतर कोणत्याही कारणास्तव परवानगी मिळू शकल्या नसेल तर सरकारला पुढे येऊन मदत करावी लागेल, असे खंवटे म्‍हणाले. विविध सरकारी विभागांकडून परवानगी मिळविण्यास होणारा विलंब दूर करण्यासाठी एक खिडकी योजना अंमलात आणावी, असा आग्रह धरला. मुख्य सचिव पुनित गोयल यांच्या सहकार्याने अनेक समस्यांचे निराकरण केले आहे. प्रत्येक प्रकल्पाचे रोडमॅप निश्चित केले आहे.

...तर पर्यटकांची संख्या वाढेल

हॉटेल प्रकल्प, सी प्लेन आणि रोप-वे यांच्याशी संबंधित कामे अद्याप अपूर्ण आहेत. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा एका महिन्यात कार्यान्वित होणार आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटकांची संख्याही वाढेल. यामुळे हॉटेल प्रकल्‍प लवकर पूर्ण होणे आवश्‍यक आहे, असे खंवटे म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA 2nd Test: 'करो या मरो' कसोटीत भारत रचणार इतिहास, वर्ल्ड क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा ठरणार तिसरा देश; इंग्लंड-ऑस्ट्रेलियाच्या यादीत होणार सामील

Ranji Trophy 2025: गोव्याने पत्करला डावाने दारुण पराभव, रणजी क्रिकेट स्पर्धेत सलग दुसरा सामना गमावला; सौराष्ट्राची प्रगती

अग्रलेख: हॉटेल, रेल्वे, रस्ते... सर्वत्र ट्रॅकिंग! गोव्यात 'चोरांचा माग' काढण्यासाठी 'रियल-टाईम' प्रणाली आवश्यक

125 वर्षांची कोकणी कला लंडनमध्ये! वर्षा उसगावकर यांनी सादर केलं 'तियात्र'; Video Viral

अग्रलेख: 'घर घर मे दिवाली है, मेरे घर मे अंधेरा' गोमंतकीय सिनेकर्मींची अवस्था

SCROLL FOR NEXT