Tourism: ‘नो मास्क-नो टोकन’ या नियमावरच सध्या कुळे येथील दूधसागर पर्यटन व्यवसाय (Business) सुरू असून कोविड (Covid-19) महामारीचे सर्व नियम तेथे पाळले जात आहेत. या व्यवसायामुळे कुळे भागात कोरोनाच्या रुग्णांत वाढ होत असल्याचा खोटा प्रचार सुरू आहे. त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे दूधसागर टूर ऑपरेटर्सने कुळे येथे घेतलेल्या पत्रकार (Journalist) परिषदेत सांगितले.
कुळेत कोरोनाचे काही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असले तरी दूधसागर जीप पर्यटनाशी त्याचा कोणताच संबंध नाही. असोसिएशन सर्व खबरदारीचे उपाय घेत असून प्रत्येक गाडीत सॅनिटायझर उपलब्ध आहे. थंडी झालेल्या व्यक्तींना चालकाचे काम करू दिले जात नाही. एखादा ड्रायव्हर तशा प्रकारे आढळल्यास दुसऱ्या ड्रायव्हरची व्यवस्था केली जात आहे. गरज भासल्यास पूर्ण जीप गाडी सॅनिटायझर केली जाते.
अशा अनेक खबरदारीचा उपायांमुळे दूधसागर पर्यटन व्यवसाय अत्यंत सुरक्षित आहे असे संघटनेचे अध्यक्ष दिलीप मयेकर यांनी सांगितले.
दोन महिन्यांत कोरोनाचा रुग्ण नाही
मागच्या चार दिवसांत दूधसागर पर्यटनाविषयी काही बातम्या प्रसिद्ध होत आहेत. पण त्या वस्तुस्थितीला धरून नाही. यंदाचा हंगाम २ ऑक्टोबरपासून सुरू झालेला आहे. मात्र या दोन महिन्यांत जीपमालक, ड्रायव्हर, गाईड वा व्यावसायिकांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद नाही, असे मयेकर म्हणाले. या कार परिषदेला सचिव ब्रिजेश भगत, खजिनदार जानबा लांबोर, सदस्य नरेश शिगावकर, ट्रिपलो सौझा उपस्थित होते.
गोव्यात पर्यटन हा एकमेव महत्त्वाचा व्यवसाय आहे. कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे सर्वांना जबर फटका बसला आहे. त्यातच दूधसागर पर्यटन व्यावसायिकांनाही झळ बसली असून नुकताच कुठे हा व्यवसाय पुन्हा जम बसवू पाहत आहे. अशा वेळी अपप्रचार करून गैरसमज निर्माण करणे योग्य नाही. कोरोना महामारीचे सर्व नियम पाळूनच हा व्यवसाय सुरू आहे.
- दिलीप मयेकर, दूधसागर टूर ऑपरेटर्सचे अध्यक्ष
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.