Tourism Minister Rohan Khaunte Strict action would be taken against water sports operators working illegally Dainik Gomantak
गोवा

Water Sports In Goa: विनापरवाना जलक्रीडा व्यावसायिकांवर होणार कडक कारवाई; पर्यटनमंत्र्यांचा सज्जड दम!

Tourism Minister Rohan Khaunte: मुरगाव बंदराकडे जाणारी ‘नेरूल पॅराडाईज’ ही पर्यटक बोट तटरक्षक दलाच्या बचावकार्यामुळे वाचली.

गोमन्तक डिजिटल टीम

Water Sports In Goa

मुरगाव बंदराकडे जाणारी ‘नेरूल पॅराडाईज’ ही पर्यटक बोट तटरक्षक दलाच्या बचावकार्यामुळे वाचली. या घटनेची दखल घेत समुद्र किनाऱ्यांवर पर्यटन खात्याच्या परवानगीशिवाय जलक्रीडा व्यवसाय करणाऱ्यांना कडक कारवाईचा इशारा पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिला आहे.

राज्यातील किनाऱ्यांवरील जलक्रीडा ऑपरेटर्स असोसिएशनकडे परवानगी असलेल्या व्यावसायिकांची माहिती मागविली आहे. परवानगी नसताना जलक्रीडा तसेच पर्यटकांना बोटीने खोल समुद्रात नेऊन हे ऑपरेटर्स त्यांच्या जीविताशी खेळत आहेत. जलक्रीडा प्रकाराच्या नावाखाली पर्यटकांना खोल समुद्रात घेऊन जाणाऱ्या बोटींसाठी परवाने दिले आहेत का, याची चाचपणी केली जाणार आहे. त्यांना बंदर कप्तानबरोबरच पर्यटन खात्याचा परवाना आहे की नाही, याची येत्या काही दिवसांत जलक्रीडा ऑपरेटर्सकडून माहिती घेऊन तपासणी केली जाणार आहे.

...तर जलक्रीडा व्यवसाय बंद

जलक्रीडा व्यवसायासाठी आवश्‍यक ती परवानगी नसेल तर संबंधितांचा व्यवसाय बंद केला जाईल. काहीजण बेकायदा जलक्रीडा व्यवसाय करत असल्याने तेथे या व्यावसायिकांची गर्दी होऊन दैनंदिन व्यवसायावर परिणाम होत आहे. सिकेरी येथे आणखी जलक्रीडा ऑपरेटर्सना परवानगी न देण्याचे पत्र आमदार मायकल लोबो यांनी यापूर्वीच दिले आहे, असेही मंत्री खंवटे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai - Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाबाबत मोठी अपडेट, मुख्य बोगदा १५ दिवस राहणार बंद

Bhopal Goa Flight: भोपाळ ते गोवा थेट विमानसेवा! पहिल्यांदाच 180 आसनी क्षमतेचे बोईंग प्रवाशांच्या सेवेत

IPL Auction: 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीवर पडला पैशांचा पाऊस, RR च्या ताफ्यात सामील; संजूच्या नेतृत्वाखाली करणार गर्दा!

धक्कादायक! 'गोवा सोड अन्यथा..', धमकी देत मारहाण करणाऱ्या 'मगो'च्या नेत्याला अटक

Goa Cabinet: दोन दिवसांत गोवा मंत्रीमंडळात फेरबदल? मुख्यमंत्री सावंतांची दिल्लीत खलबंत, मंत्री-नेत्यांशी भेटीगाठी

SCROLL FOR NEXT