Tourism Minister Rohan Khaunte Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: पर्यटकांसाठी गोव्यात 'स्वदेश दर्शन', भाजप सरकार बनवणार धोरण; 'या' तालुक्यांची निवड

Tourism Minister Rohan Khaunte: राज्यातील ग्रामीण भागात असलेल्या पर्यटनस्थळांची माहिती पर्यटकांपर्यंत पोहचवण्यासाठी सरकारतर्फे ग्रामीण पर्यटन धोरण तयार करण्यात येत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यातील ग्रामीण भागात असलेल्या पर्यटनस्थळांची माहिती पर्यटकांपर्यंत पोहचवण्यासाठी सरकारतर्फे ग्रामीण पर्यटन धोरण तयार करण्यात येत आहे. सत्तरी, पेडणे, डिचोली, काणकोण, सांगे व सावर्डे हे तालुके ग्रामीण पर्यटनासाठी निवडण्यात आले आहेत. ‘स्वदेश दर्शन’ योजनेमार्फत पर्यटकांना राज्यातील ग्रामीण भागातील पर्यटन स्थळांकडे आकर्षित केले जात असल्याची माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी प्रश्‍नोत्तर आज प्रश्‍नोतर तासावेळी विधानसभेत दिली.

डिचोली मतदारसंघातील ग्रामीण भागामध्ये ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन खात्याने कोणती पावले उचलली आहेत. या मतदारसंघात कोणती व्यावसायिक पर्यटन कामे हाती घेतली आहेत. गेल्या तीन वर्षांत खात्याने या मतदारसंघात काही धार्मिक स्थळे निवडली आहेत व त्यासाठी दूरदर्शी आराखडा तयार केला आहे का? गोव्यात ग्रामीण पर्यटनाला किती विदेशी व देशी पर्यटकांनी भेट दिली आहे, यासंदर्भातचा प्रश्‍न डिचोलीचे आमदार चंद्रकांत शेट्ये यांनी विचारला होता.

प्रश्‍नाला उत्तर देताना मंत्री खंवटे म्हणाले की, गेल्या पर्यटन मोसमात राज्यात सुमारे साडेचार लाख विदेशी तर ८४ लाख देशी पर्यटकांनी भेट दिली. ग्रामीण पर्यटनाला पर्यटकांनी दिलेल्या भेटीची माहिती खात्यातर्फे ठेवली जात नाही. पर्यटन धोरणानुसार सरकारने ‘समुद्रकिनारे पलीकडले’ या संकल्पनेखाली ग्रामीण पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

दरम्यान, ग्रामीण पर्यटनखाली पर्वरी व मये येथील भाग पर्यटकांसाठी आकर्षित करण्यात येणार आहे. डिचोली तालुक्यात शापोरा नदी आहे तेथे बॅकवॉटर बोटींग सुरू करण्यास संधी आहे. त्यामुळे डिचोली तसेच बार्देश तालुक्यातील युवकांना स्वयंरोजगार मिळण्यास मदत होईल. त्यामुळे ग्रामीण पर्यटन धोरण केव्हापर्यंत तयार होणार आहे, असा प्रश्‍न आमदार शेट्ये यांनी केला.

साधनसुविधा वाढविणार

सध्या ग्रामीण भागात पर्यटनासाठी आवश्‍यक असलेल्या साधनसुविधा कमी आहेत. त्या वाढवण्यात येणार आहेत. केंद्राच्या ‘स्वदेश दर्शन’ या संकल्पनेखाली किनारीपट्ट्यांतील कोलवा व ग्रामीण भागातील पर्वरी ते हळदोणा-कोलवाळ या ठिकाणांची निवड केली आहे. मये व त्याच्या आजूबाजूच्या परिसरात ग्रामीण पर्यटन वाढीसाठी सुमारे १० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. राज्य व केंद्र सरकारच्या निधीतून चर्च व मंदिरांच्या सौंदर्यीकरण व रोषणाई यावर भर देण्यात येत आहे, असे मंत्री रोहन खंवटे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT