Shigmotsav in goa Dainik Gomantak
गोवा

Goa Shigmotsav 2023: रात्री दहाच्या आत शिगमा! वाचा वेळापत्रक

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Shigmotsav 2023: मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने ध्वनिप्रदूषणाबाबत दिलेल्या आदेशाचा थेट परिणाम वार्षिक शिगमोत्सव मिरवणुकीवर होणार आहे. रात्री 10 वाजेपर्यंत चित्ररथ मिरवणूक आटोपती घ्‍या अशी सूचना शिगमोत्‍सव समित्यांना करण्‍यात आली आहे.

दुसरीकडे शिगमोत्‍सव मिरवणूक आयोजित केल्या जाणाऱ्या भागात रात्री 10 नंतर ध्वनिमर्यादा शिथिल करण्याची विनंती मुख्यमंत्रांना करणार आहे. परंतु अद्याप तरी ध्वनिप्रदूषणाचे नियम लागू आहेत, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

दरम्‍यान, 8 मार्चपासून शिगमोत्‍सव मिरवणूक सुरू होणार असून ती 21 मार्चपर्यंत चालणार आहे. या 14 दिवसांच्या कालावधीत 18 ठिकाणी मिरवणूक होणार आहे.

न्‍यायालयाने ध्वनिप्रदूषणाविरोधात दिलेल्‍या आदेशाची अंमलबजावणी झालीच पाहिजे. हेच नियम कार्निव्हलला देखील लागू करण्यात आले होते, असे खंवटे यांनी सांगितले.

दरम्‍यान, शिगमोत्सव सुरळीत पार पडावा यासाठी सर्व शिगमोत्सव समित्यांची बैठक आज पर्यटन भवनात झाली. यावेळी पोलिस, अग्निशमन दल, आरोग्य, पर्यटन खात्‍याचे अधिकारी तसेच जिल्हाधिकारी उपस्‍थित होते. या पत्रकार परिषदेला उपसभापती ज्योशुआ डिसोझा, मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये व इतर मान्यवर उपस्थित होते.

"पणजीत सुरू असलेल्या ‘स्मार्ट सिटी’च्‍या कामांमुळे जागोजागी रस्‍ते खोदण्‍यात आलेले आहेत. त्‍यामुळे शिगमोत्सव मिरवणूक सुरळीतपणे पार पडणार की नाही याबाबत शंकाच आहे."

"मिरवणूक सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी स्थानिक शिगमोत्सव समितीवर आहे. त्‍यासाठी समिती स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधेल."

- रोहन खंवटे, पर्यटनमंत्री

शिगमोत्सव मिरवणुकीचे वेळापत्रक

यंदाची शिगमोत्सव मिरवणूक उत्तर गोव्यातून सुरू होऊन पूर्ण झाल्यानंतर दक्षिण गोव्यात जाणार आहे. गोंधळ कमी करण्याच्या उद्देशाने वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.

8 मार्चला फोंडा येथून मिरवणुकीला प्रारंभ होईल. 9 मार्च : कळंगुट, दि. 10 : साखळी आणि डिचोली, दि. 11 : पणजी, दि. 12 : पर्वरी, दि. 13 : म्हापसा, दि. 14 : वाळपई आणि पेडणे, दि. 15: सांगे, दि. 16 : कुडचडे आणि केपे, दि. 17 : वास्को, दि. 18 : मडगाव, दि. 19 : शिरोडा आणि धारबांदोडा, दि. 20 : कुंकळ्ळी आणि दि. 21 मार्च : काणकोण.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhandari Community In Goa: निवडणुकीची घोषणा होणार? भंडारी समाजाच्या आमसभेकडे सगळ्यांचे लक्ष

Mhadei Water Dispute: 'म्हादई'बाबत चुकीची माहिती नको! नेरसे येथे जलवाहिनीचे काम सुरु नाही

Goa Forward: नोकरभरतीसंदर्भात 'सात दिवसांत' योग्य निर्णय घ्या; गोवा फॉरवर्डची मागणी

Subhash Velingkar: आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वेलिंगकरांच्या अटकेसाठी गोवा पोलिसांची महाराष्ट्रात शोध मोहीम!

खरी कुजबुज: जीत - मायकल आमने सामने

SCROLL FOR NEXT