Subhash Velingkar: आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वेलिंगकरांच्या अटकेसाठी गोवा पोलिसांची महाराष्ट्रात शोध मोहीम!

Saint Xavier DNA Test Row: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या विरोधात राज्यभर रान पेटले आहे.
Subhash Velingkar: आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वेलिंगकरांच्या अटकेसाठी गोवा पोलीसांची महाराष्ट्रात शोध मोहीम!
Search operation by goa police in maharashtra for subhash velingkar arrest saint Xavier DNA test rowDainik Gomantak
Published on
Updated on

सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या विरोधात राज्यभर रान पेटले आहे. त्यांच्या अटकेची मागणी होत असतानाच, हिंदुत्ववादी संघटना मात्र वेलिंगकर यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या आहेत. वेलिंगकर यांना समर्थन देण्यासाठी म्हापशात हिंदूची सभा झाली. दरम्यान, वेलिंगकरांना पकडण्यासाठी आता गोवा पोलिसांनी राज्यासह शेजारील महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये शोध मोहीम सुरु केली आहे. आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर सुभाष वेलिंगकर गायब झाले आहेत. सीमावर्ती भागात गोवा पोलिसांनी ही मोहीम सुरु केली आहे. वेलिंगकरांच्या विरोधात गोव्यामध्ये संतप्त भावना उमटत आहेत. गोव्यातील अनेक भागांमधून वेलिंगकर यांच्या अटकेची मागणी करणारी निवेदने सादर केली जात आहेत.

दुसरीकडे, ख्रिश्चन बांधव आणि समाजातील नेत्यांनी रस्त्यावर उतरुन वेलिंगकरांच्या वक्तव्याचा निषेध करत तात्काळ अटकेची मागणी केली आहे. शुक्रवारी (5 ऑक्टोबर) सायंकाळी डिचोली पोलिसांकडून वेलिंगकर यांच्याविरोधात गुन्हाही नोंदवण्यात आला.

Subhash Velingkar: आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वेलिंगकरांच्या अटकेसाठी गोवा पोलीसांची महाराष्ट्रात शोध मोहीम!
Subhash Velingkar: वेलिंगकरांविरुद्ध आंदोलक आक्रमक; अनेक ठिकाणी तक्रारी दाखल, अटकेसाठी हालचाली सुरु

वेलिंगकरांना अटक झालीच पाहिजे: लोबो

सेंट फ्रान्सिस झेवियर हे तमाम गोमंतकीयांचे श्रद्धास्थान तसेच सायब आहेत. दरवर्षी होत असलेल्या त्यांच्या नोव्हेना तसेच फेस्ताला ख्रिश्चन बांधवांबरोबरच हिंदू तसेच इतर धर्मीय मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात. अशा संताच्या बाबतीत अपमानास्पद टीप्पणी करणाऱ्या सुभाष वेलिंगकर यांना तात्काळ अटक झालीच पाहिजे. किंबहुना त्यांना अटक करण्याचे आश्वासन मला राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्याचे शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com