Rohan Khaunte Dainik Gomantak
गोवा

Japanese Tourist Fraud Case: जपानी पर्यटकाला लुबाडणाऱ्यांना अटक करणाऱ्या पोलिसांना 50 हजाराचे बक्षिस

पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांची घोषणा, गोवा पर्यटकांसाठी सुरक्षित

दैनिक गोमंतक

Japanese Tourist Fraud Case: जपानी पर्यटक तात्सुकी याची गोव्यातील हणजुण समुद्रकिनारा परिसरात एका टोळक्याने लुबाडणूक केली होती. तात्सुकी यांना रोकड, फोन व इतर साहित्य असे एकूण सुमारे साडे नऊ लाखांना लुबाडले गेले होते. तात्सुकी यांनी ट्विटरवरून याबाबत कैफियत मांडली होती.

त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली होती. पोलिसांनी तत्परतेने या प्रकरणातील संशयितांना अटक केल्याने पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस पथकाला 50 हजार रूपयांचे बक्षीस जाहीर केले.

बुधवारी पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी म्हापसा उपविभागीय पोलीस कार्यालयाचे प्रभारी उपअधीक्षक राजेश कुमार यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी जपानी पर्यटकाबाबत घडलेल्या सर्व प्रकाराची सविस्तर माहिती घेतली. त्यातील तपासाची माहिती घेतली. या भेटीत खंवटे यांनी पोलिसांच्या या कामगिरीबद्दल प्रशंसा करीत त्यांची पाठ थोपटली.

रोहन खंवटे म्हणाले की, गोवा हे पर्यटन स्थळ आहे आणि येथे पर्यटकांना सुरक्षित वाटले पाहिजे. पर्यटकांना सुरक्षित वातावरण देणे हे आमचे काम आहे. जपानी पर्यटकाच्या फसवणूक प्रकरणात पोलिसांनीही तातडीने दखल घेत कार्यवाही केली आहे. त्यासाठीच मी आज म्हापशात येऊन पोलिसांचे अभिनंदन केले.

पर्यटकांना सुरक्षिततेची खात्री वाटली पाहिजे. पर्यटक गोव्यात आले पाहिजेत. पोलिसांनी चांगले काम केले आहे. गोवा पर्यटकांसाठी सुरक्षित आहे, हा मेसेज यातून जातो. त्यांना प्रोत्साहन म्हणून पन्नास हजार रूपयांचे बक्षिस जाहीर केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

New Zuari Bridge: 'झुआरी'वरील मनोऱ्याचे काम 2031 पर्यंत पूर्ण, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची लोकसभेत माहिती

Arpora Nightclub Fire: क्लबच्या तीन कर्मचाऱ्यांच्या जामिनावरील सुनावणी तहकूब, अंतरिम जामिनावर मंगळवारी, तर मुख्य अर्जावर 28 रोजी सुनावणी

क्रीडा विश्वात खळबळ! वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या दिग्गज क्रिकेटपटूला होणार अटक, नेमकं प्रकरण काय?

Yamuna Expressway Accident: यमुना एक्सप्रेसवेवर थरार! दाट धुक्यामुळे आठ बस आणि तीन कारची टक्कर; 4 जणांचा मृत्यू VIDEO

Goa Winter Update: राज्यात थंडीचा कडाका वाढला, पुढील काही दिवस कसं असेल हवामान? वाचा

SCROLL FOR NEXT