Rohan Khaunte Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: गोव्याचे किनारे 'दलालमुक्त' होणार! पर्यटनमंत्री खंवटेंचा निर्धार; हंगामाच्या प्रारंभी पर्यटक वाढल्याचा दावा

Rohan Khaunte: खंवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत गोव्यात येणाऱ्या एकूण पर्यटक संख्येत ६.२३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: पर्यटन क्षेत्र बेकायदा दलालमुक्त (टाउटस् फ्री) करण्याचा निर्धार पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. त्यांनी गोमंतकीय युवकांना छायाचित्रकार आणि पर्यटक मार्गदर्शक म्हणून काम करण्यास पुढे यावे, असे आवाहनही केले.

यावेळी त्यांच्यासोबत पर्यटन संचालक केदार नाईक आणि सरव्यवस्थापक गॅव्हिन डायस, उपसरव्यवस्थापक दीपक नार्वेकर उपस्थित होते. कोणीतरी कुठून येणार आणि येथे पर्यटक छायाचित्रकार म्हणून काम करणार, हे मान्य नाही.

अशांना पर्यटन खात्याने यापूर्वी मान्यता दिली असली तरी १५ वर्षे रहिवासाचा दाखला त्यांच्याकडे नसल्यास त्यांचा परवाना रद्द केला जाईल, असे खंवटे यांनी नमूद केले. छायाचित्रकार तसेच पर्यटक मार्गदर्शक म्हणून काम करू इच्छीणाऱ्या गोमंतकीयांना पर्यटन खाते विनाशुल्क प्रशिक्षण देईल, असेही त्यांनी नमूद केले.

नव्या पर्यटन हंगामाच्या सुरुवातीला गोव्याच्या पर्यटन क्षेत्राने लक्षणीय वाढ नोंदवली आहे. खंवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत गोव्यात येणाऱ्या एकूण पर्यटक संख्येत ६.२३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

२०२४ मध्ये ६९,२४,९३८ देशांतर्गत पर्यटक गोव्यात आले होते, तर २०२५ मध्ये ही संख्या ७२,९६,०६८ वर पोहोचली असून ५.३६ टक्क्यांची वाढ नोंदविली आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या २०२४ मधील २,५९,८२० वरून ३,३६,०३१ इतकी झाली असून २९.३३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मंत्री खंवटे म्हणाले, पर्यटन हे गोव्याच्या सकल राज्य उत्पादनाच्या सुमारे १६.४३ टक्के इतके योगदान देते आणि राज्यातील ४० ते ४५ टक्के थेट व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करते. पहिल्यांदाच पावसाळी महिन्यांतही पर्यटक संख्येत वाढ झाली असून, हे वर्षभर पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेल्या उपक्रमांचे यश दर्शवते.

हॉटेल क्षेत्रातील अनियमितता थांबवण्यासाठी तपास मोहीम सुरू असून, चुकीच्या श्रेणीतील हॉटेल्सना नोंदणी नियमित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हॉटेल नोंदणी व परवाना नूतनीकरणाची प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली आहे.

समारोप करताना मंत्री खंवटे म्हणाले, गोवा पर्यटन विभाग आता केवळ नियंत्रणाकडून सबलीकरणाच्या दिशेने वाटचाल करत आहे. सहकार्य, जबाबदारी आणि नवोन्मेष या तीन स्तंभांवर आधारित गोव्याचे पर्यटन भविष्य घडवले जात आहे. समग्र आणि शाश्वत पर्यटनवाढ हीच आमची दिशा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘टीटीएजी’कडून निर्णयाचे स्वागत

१ गोवा पर्यटन व्यावसायिक संघटनेने (टीटीएजी) समुद्र किनाऱ्यांवर अनधिकृत विक्रेते व फेरीवाल्यांविरोधात कारवाईचे स्वागत केले आहे.

२ संघटनेने म्हटले आहे, की ‘टीटीएजी’ने नेहमीच गोव्याच्या समुद्र किनाऱ्यांवर वाढत चाललेल्या अनधिकृत फेरीवाल्यांच्या समस्येबाबत ठाम भूमिका घेतली आहे.

३ अनेक रस्त्यांवर विविध वस्तू विकणारे, पर्यटकांना त्रास देणारे अनधिकृत फेरीवाले आणि दलाल यांची संख्या वाढत आहे, ही गंभीर बाब आहे.

४ पर्यटनावर प्रतिकूल परिणाम करणाऱ्या अशा कृत्यांविरोधात सातत्याने कारवाई होणे गरजेचे असून, ही प्रक्रिया सुरू ठेवावी आणि अशा प्रकारच्या अनधिकृत हालचालींना आळा घालावा.

पर्यटनाची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगती

खंवटे म्हणाले की, हवाई सेवांची मर्यादित उपलब्धता असूनही गोव्याने एकतेरिनबर्ग, कझाकस्तान, नोवोसिबिर्स्क आणि मॉस्को अशा नव्या गंतव्यांपर्यंत पोहोच साधली आहे. फक्त ऑक्टोबर २०२५ महिन्यात रशिया व मध्य आशियातून ३४ चार्टर विमानसेवा गोव्यात दाखल झाल्या. तसेच यूकेस्थित तुई एअरवेज ही प्रमुख चार्टर कंपनी मॅन्चेस्टर आणि गॅटविक येथून थेट उड्डाणे सुरू करणार असून ३० ते ४० हजार प्रवाशांचा ओघ अपेक्षित आहे. याशिवाय नॉर्वे, डेन्मार्क, स्वीडन आणि फिनलंडसारख्या नव्या बाजारपेठांवर लक्ष केंद्रीत केले जात आहे.

गोमंतकीयांचे सबलीकरण

राज्यातील तरुणांना संधी मिळावी, यासाठी दोन नवे उपक्रम जाहीर करण्यात आले. यात प्रमाणित पर्यटन सुविधा कार्यक्रम याअंतर्गत ७२ प्रशिक्षित मार्गदर्शक कार्यरत करण्यात येतील. तसेच बीच फोटोग्राफी नोंदणी योजनेनुसार सर्व छायाचित्रकारांना ओळखपत्र अनिवार्य करणार असून, मूळ गोमंतकीयांसाठी स्वतंत्र योजना सुरू केली जाईल.

नवीन धोरणे आणि उपक्रम

खंवटे म्हणाले की, एअरोस्पोर्टस आणि वेलनेस टुरिझम पॉलिसी लवकरच अधिसूचित करण्यात येतील. ‘गोवा बियॉन्ड बीचेस’ या संकल्पनेअंतर्गत ईको-टुरिझम, साहसी, विवाह, आरोग्य व परिषद पर्यटन या क्षेत्रांना चालना देत महिलांच्या सहभागावर आधारित समावेशक पर्यटनाला प्रोत्साहन दिले जात आहे.

जबाबदार पर्यटनावर भर : मंत्री खंवटे म्हणाले की, गोव्याची ‘शाश्वत व दर्जेदार पर्यटन स्थळ’ ही प्रतिमा टिकविण्यासाठी सर्व संबंधितांनी योगदान द्यावे. यंदा पहिल्यांदाच शॅक्स पर्यटन हंगाम सुरू होण्याआधीच कार्यान्वित झाले, तर वॉटर स्पोर्टस व्यावसायिकांनाही वेळेवर परवानग्या देण्यात आल्या. पारदर्शकता राखण्यासाठी ६ शॅकचालकांचे परवाने उपभाडेकरूप्रकरणी रद्द करण्यात आले, असेही त्यांनी सांगितले.

केंद्राचे सहकार्य

खंवटे यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत गोव्यातील प्रमुख पर्यटन प्रकल्पांसाठी केंद्र सरकारकडून ४७२ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यात स्वदेश दर्शन, टाऊन स्क्वेअर, युनिटी मॉल आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या प्रकल्पांचा समावेश आहे. भविष्यात ‘गोवा कॉन्सर्ट इकॉनॉमी’ विकसित करून राज्यात नव्या प्रकारचे मनोरंजन व सांस्कृतिक पर्यटन घडविण्याच्या दिशेने वाटचाल करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025 Final: क्रिकेटचं वेड! तिकिटाचा दर 1.3 लाखांहून अधिक, तरीही 'फायनल' पाहण्यासाठी चाहत्यांची मुंबईत तुफान गर्दी

गोवा झालं महाग! पर्यटनाच्या नावाखाली लूट, 'कचऱ्याचे ढिग' आणि 'टॅक्सीवाल्यांची दादागिरी', पर्यटकाने शेअर केला धक्कादायक अनुभव

पिर्णा हत्या प्रकरण 15 तासांत उलगडले; कांदोळीतील मुख्य आरोपीला अटक

18 गुन्ह्यांचा रेकॉर्ड! गोवा-पुणे महामार्गावर 8 लाखांच्या दरोड्याचा पर्दाफाश; पोलिसांच्या वेशातील 'सराईत गुन्हेगार' जेरबंद

Valpoi Theft: ना CCTV, ना सेक्युरिटी, चोरट्यांनी गॅस कटरनं तोडली खिडकी; वाळपई पोस्ट ऑफिसमधून लाखो रुपये लंपास

SCROLL FOR NEXT