Goa Sea Food Festival 
गोवा

Goa Sea Food Festival: मिरामार येथे भव्य सीफूड फेस्टिव्हलचे आयोजन, जाणून घ्या वेळ आणि तारखा

गोव्याच्या पारंपारिक करीपासून ते सीफूड फ्यूजनपर्यंत सीफूड प्रेमी, स्थानिक आणि पर्यटकांना महोत्सवात आनंद घेता येणार आहे.

Pramod Yadav

Goa Sea Food Festival: गोवा पर्यटन खात्याच्या वतीने बहुप्रतीक्षित गोवा सीफूड फेस्टिव्हलची घोषणा करण्यात आली आहे. येत्या 9 ते 11 फेब्रुवारी या काळात पणजीतील मिरामार बीचवर खाद्यप्रेमींसाठी पर्वणी असणारा सीफूड फेस्टिव्हल आयोजित केला जाणार आहे. सायंकाळी सहानंतर रोज महोत्सवाला सुरुवात होईल.

गोव्याच्या पारंपारिक करीपासून ते सीफूड फ्यूजनपर्यंत सीफूड प्रेमी, स्थानिक आणि पर्यटकांना महोत्सवात आनंद घेता येणार आहे.

सीफूड फेस्टिव्हलमध्ये लोर्ना, श्री सातेरी - कला संघ बेथोडा - फोंडा, गोआट्रोनिक - एडविन, द एसेस आणि पारंपारिक संगीत, नृत्य आणि मनोरंजनाचे लाइव्ह परफॉर्मन्स पाहायला मिळतील. यासह चविष्ट सीफूड, विविध पेये आणि नॉन-स्टॉप मनोरंजन यांचा अनुभव घेता येईल.

सी फूड फेस्टिव्हल कचरा विलगीकरणासाठी प्रगत आणि शास्त्रोक्त पद्धतीचा वापर केला जाणार असून, महोत्सवात प्लास्टिक आणि काचेच्या बाटल्यांचा वापर केला जाणार नाही.

गोवा सीफूड फेस्टिव्हलसाठी पार्किंगची समस्या निर्माण होऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्यात आली असून, कांपाल एसएजी मैदानापासून मिरामार सर्कलपर्यंत दर 10 मिनिटांनी हॉप ऑन हॉप ऑफ सेवा सुरु राहणार आहे.

चव, संस्कृतीचा अविस्मरणीय अनुभव घेण्यासाठी गोवा सीफूड फेस्टिव्हलमध्ये सहभागी व्हा, असे आवाहन गोवा पर्यटन खात्याने केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

Goa Sexual Assault Case: वेर्णा सामूहिक बलात्कार प्रकरणातील सहआरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल!

SCROLL FOR NEXT