Rajbag Beach Cleared of Unauthorized Structures
काणकोण: गोव्याच्या प्राचीन समुद्रकिनाऱ्यांचे पावित्र्य आणि नैसर्गिक सौंदर्य जपण्याच्या उद्देशाने केलेल्या एका निर्णायक कारवाईमध्ये गोवा पर्यटन खात्याने काणकोण येथील राजबाग समुद्रकिनाऱ्यावरील सात बेकायदेशीर बांधकामे आज पाडली.
आवश्यक परवानग्यांशिवाय बांधण्यात आलेल्या बेकायदेशीर बांधकामांमुळे, केवळ पर्यावरणालाच धोका निर्माण झाला नसून समुद्रकिनाऱ्याच्या नैसर्गिक विस्तारालाही बाधक ठरले आहे. दक्षिण विभागीय कार्यालयातील, पर्यटन विभागाच्या अंमलबजावणी पथकाने, पर्यटन उपसंचालक धीरज वागळे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक प्राधिकरणांच्या समन्वयाने गोव्याच्या किनारपट्टीवरील अनधिकृत विकासांना आळा घालण्यासाठी चालू असलेल्या मोहिमेचा एक भाग म्हणून ही कारवाई केली आहे.
या कारवाईबद्दल पर्यटन संचालक तथा जीटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील (आयएएस) म्हणाले, की गोव्यातील समुद्रकिनारे पर्यटक आणि स्थानिक दोघांसाठीही सुंदर, सुरक्षित आणि टिकाऊ वातावरणात राहतील याची खात्री करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. आम्ही आमच्या किनारी क्षेत्रासाठी निर्धारित केलेल्या पर्यावरणीय समतोल आणि कायदेशीर मार्गदर्शक तत्त्वांशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही गोष्टीवर देखरेख ठेवू आणि त्याविरुद्ध आवश्यक पावले उचलून कारवाई करणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.