Tourism charges to reduce by 50 percent  
गोवा

पर्यटन शुल्क ५० टक्क्यांनी माफ

गोमंतक वृत्तसंस्था

सासष्टी: गोव्यातील शॅकमालकांनी भरलेले पर्यटन शुल्क कोरोनामुळे वाया गेल्याने यंदाच्या हंगामाला पर्यटन शुल्कावर सवलत देण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली होती. यावर मुख्यमंत्री सावंत आणि पर्यटनमंत्री बाबू कवळेकर यांनी लक्ष केंद्रीत करून पर्यटन शुल्क ५० टक्क्यांनी माफ केले आहे, अशी माहिती गोवा शॅकमालक कल्याण सोसायटीचे अध्यक्ष क्रुझ कार्दोझ यांनी दिली, तर आता पर्यटन विभागाने शॅकचे सीमांकान करण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

यंदा उशिरा सुरू झालेला पर्यटन व्यवसाय कोरोनामुळे मार्च महिन्यातच संकटात पडला होता. कोरोनामुळे सर्व शॅकमालकांनी मार्च अखेरपर्यंत सर्व शॅक हटविली होती. त्यामुळे शॅकमालकांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शॅकमालकांनी पर्यटन हंगाम सुरू होण्यापूर्वी भरलेले पर्यटन शुल्क वाया गेल्याने सरकारने यंदाच्या हंगामाला पर्यटन शुल्कावर शॅकमालकांना सवलत देणे गरजेचे बनले होते. याची दखल घेऊन सरकारने हे शुल्क ५० टक्क्यांपर्यंत माफ केलेले आहे, असे अध्यक्ष कार्दोझ यांनी सांगितले. कोरोना महारामारीमुळे व्यवसाय ठप्प झाल्याने आधीच नुकसानी झालेली असून आता पर्यटन विभागाने शॅकचे सीमांकान करण्यावर भर देणे आवश्यक आवश्‍यक असल्याचे क्रुझ कार्दोझ यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Army Jawan Assaulted: देशरक्षकच असुरक्षित? लष्कराच्या जवानाला टोल नाक्यावर खांबाला बांधून मारहाण, 6 जण अटकेत

Heavy Rain in Goa: राज्याला मुसळधार पावसाचा तडाखा; 100 इंचापेक्षा जास्त पावसाची नोंद

Pune-Sindhudurg Flight: पुण्यातील कोकणवासियांना बाप्पा पावला... गणेश चतुर्थीनिमित्त 'Fly91'च्या उड्डाण संख्येत वाढ, वाचा सविस्तर

Memu Special Train: कोकणातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, 'या' मार्गावर धावणार अनारक्षित मेमू स्पेशल ट्रेन

कारच्या धडकेत एका मुलीसह आठ जण जिवंत जाळले; गुजरातमधील घटना

SCROLL FOR NEXT