Election in Goa  Dainik Gomantak
गोवा

Zilla Panchayat Election : छाननीनंतर जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीसाठी 16 अर्ज

8 ऑक्टोबरला अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. त्यानंतरच निवडणूक रिंगणात राहिलेल्या उमेदवारांच्या लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Zilla Panchayat Election : जिल्हा पंचायतीच्या तीन मतदारसंघासाठी 19 उमेदवारांनी 20 अर्ज दाखल केले होते. आज अर्जांची छाननी झाल्यानंतर त्यापैकी 4 उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरले. त्यामुळे 16 उमेदवार रिंगणात उरले आहेत. 8 ऑक्टोबरला अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. त्यानंतरच निवडणूक रिंगणात राहिलेल्या उमेदवारांच्या लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

अर्जांच्या छाननीनंतर रेईश मागूश मतदारसंघातून 4 उमेदवार असून कोणाचाही अर्ज अपात्र ठरला नाही. दवर्ली मतदारसंघात 8 उमेदवार राहिले असून भाजपचे बदली उमेदवार कपिल देसाई व काँग्रेसचे बदली उमेदवार मायला रोचा हे अपात्र ठरले आहेत. कुठ्ठाळी मतदारसंघात 4 उमेदवार पात्र ठरले असून काँग्रेसचे बदली उमेदवार अनिता सौझा व वालेंट बार्बोझांचा दोनपैकी एक अर्ज रद्द करण्यात आला आहे.

लोकसभेची तयारी

या निवडणुकीत भाजपला या तिन्ही जागा जिंकून मतांचे बळ वाढवायचे आहे. पुढील लोकसभेसाठी राज्यातून दोन्ही खासदाराच्या जागा जिंकण्याच्या दृष्टीने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने रेईश मागूश, दवर्ली हे मतदारसंघ जिंकण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ZP ELection 2025: प्रचाराचा आज अखेरचा दिवस, भाजप, काँग्रेसच्‍या दिग्गजांकडून 'पायाला भिंगरी'

Goa Road Accident: 16 दिवसांत 14 रस्ताबळी, यंदा आतापर्यंत रस्‍त्‍यांवरील अपघातात 249 ठार

Goa Nightclub Fire: प्रकृती इतकी गंभीर होती तर विदेशात पळून का गेलात? लुथरांविरोधात सरकारी वकिलांचा युक्तिवाद

Goa Nightclub Fire: लुथरा बंधूंना 5 दिवसांची पोलिस कोठडी, विशेष निवास व्यवस्था; झोपण्यासाठी मागितलेल्या गादीची मागणी फेटाळली

Horoscope:भाग्याचा तारा चमकणार! 'या' राशींना मिळणार सुखाची बातमी, वाचा तुमचे भविष्य!

SCROLL FOR NEXT