Tomato  Dainik Gomantak
गोवा

Tomato Rate : टोमॅटो दरवाढ विक्रेत्यांच्या पथ्यावर!

खुल्या बाजारात १२० रुपयांवर विक्री, दलालांची मनमानी सुरू

गोमन्तक डिजिटल टीम

Tomato Rate : शेतकऱ्यांकडून बेळगाव बाजारात घाऊक पद्धतीने ७० ते ८० रुपयांनी खरेदी होणारा टोमॅटो गोव्यात ग्राहकांच्या हाती पडेपर्यंत त्याचा दर १२० रुपयांवर गेला आहे. त्यामुळे ४० रुपयांचा मलिदा घाऊक व्यापारी, किरकोळ विक्रेत्यांच्या खिशात जात असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. दलालांची मनमानी सुरू आहे.

टोमॅटो खरेदी करून किरकोळ विक्रेते १२० रुपये किलो दराने विकत आहेत. याचा सर्वाधिक मोठा फटका ग्राहकाला बसत आहे. देशभरात टोमॅटोचे दर वाढल्याने त्याचा गैरफायदा किरकोळ विक्रेते उठवत आहेत. त्याला लगाम घालण्याची व्यवस्था राज्यात नाही.

राज्याच्या फलोत्पादन महामंडळाकडे भाजीपाला विक्री होतो, पण त्यांच्या केंद्रावर मिळणाऱ्या टोमॅटोचा दर्जा जेमतेम असतो. शंभर रुपयांखाली त्याचे दर असले तरी ग्राहक ‘आलीया भोगाशी असावे साधन'' असे म्हणतच खरेदी करीत आहेत.

पावसाने ओढ दिल्याचा काहीसा परिणाम भाजीपाल्यांच्या उत्पादनावर झाला आहे. बाजारात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांचे दर वाढल्याची बाब खरी असली तरी विक्रेते आणि व्यापारी शेतकऱ्यांसह ग्राहकांना लुटत आहेत हे दरावरून स्पष्ट दिसते.

कमी उत्पादनामुळे टंचाई

बेळगाव बाजारातून येणारा टोमॅटो घाऊक दराने तेथील व्यापारी ७० ते ८० रुपयांच्या दराने खरेदी करतात. गोव्यात किरकोळ विक्रेत्यांना येथील व्यापारी २७ किलोचा क्रेट २६०० रुपयांना विकतो. म्हणजे साधारण ९८ रुपये किलोचा दर पडत असला तरी येथील विक्रेते एकाच भावाने म्हणजे १२० रुपये किलोने विकतात. महाराष्ट्र व कर्नाटकातील काही टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना सध्याच्या दरवाढीचा फायदा झालेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT