Petrol Diesel Price in Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घ्या

दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चार महानगरांमध्ये आजही तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Petrol-Diesel Price: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण सुरूच असून शुक्रवारी सकाळी जाहीर झालेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींवरही त्याचा परिणाम दिसून आला. सरकारी तेल कंपन्यांनी आज बिहारपासून राजस्थानपर्यंत अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले आहेत. मात्र, दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चार महानगरांमध्ये आजही तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

सरकारी तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, बिहारची राजधानी पाटणा येथे आज पेट्रोल 11 पैशांनी स्वस्त होऊन 107.48 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे, तर डिझेल 10 पैशांनी घसरून 94.26 रुपये प्रति लिटरवर पोहोचले. त्याचप्रमाणे, राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये पेट्रोल 6 पैशांनी स्वस्त होऊन 108.48 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 5 पैशांनी घसरून 93.72 रुपये प्रति लिटर झाला आहे.

गोव्यातील आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

Goa Petrol Price

  • North Goa ₹ 98.08

  • Panjim ₹ 98.08

  • South Goa ₹ 97.41

Goa Diesel Price

  • North Goa ₹ 90.62

  • Panjim ₹ 90.62

  • South Goa ₹ 89.97

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

X Post Scheduling Feature: WhatsApp नंतर आता X वरही भन्नाट फीचर! युजर्संना 18 महिने आधी पोस्ट शेड्यूल करता येणार; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग 2028 पर्यंत टळल्यास मोठा फटका? थकबाकीमुळे बिघडू शकतो हिशोब; अहवालात समोर आली महत्त्वाची माहिती

Goa Shipyard Dredger Launch: आंतरराष्ट्रीय जहाजबांधणीत गोवा शिपयार्डची झेप; अत्याधुनिक हायब्रीड ड्रेजरचे यशस्वी लॉन्चिंग

High Tide Waterlogging: खाडीच्या पाण्याचा नेवगीनगरला वेढा; महानगरपालिका कायमस्वरूपी उपाय कधी करणार?

Viral Video: होकार मिळताच झाला गेम! समुद्रकिनारी गर्लफ्रेंडला प्रपोज करणं पडलं महागात, महागडी हिऱ्याची अंगठी थेट समुद्रात पडली अन्... पाहा व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT