Accident News Dainik Gomantak
गोवा

Goa News: सांगे येथील दुचाकी अपघातात मायलेक जखमी, भाजप - मगो युतीचा वाद शिगेला; वाचा गोव्यातील ठळक घडोमोडी

Today's Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि इतर महत्वाच्या घडामोडी

Akshata Chhatre

Accident: टेम्पो आणि दुचाकीचा अपघात – आई-मुलगी जखमी

झानोडे केवोना, सांगे येथे टेम्पो आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. केपे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही वाहने एकाच दिशेने जात असताना टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील प्रतिक्षा मलकर्णेकर (४९) आणि त्यांची मुलगी गावकर (२३) गंभीर जखमी झाल्या.

Goa Politics: "सद्याचा मगो माधवरावांच्या गोठ्यातला पक्ष, एकेकाळी हे काँग्रेसचे एजंट ह्यांना फक्त कमिशन; पर्संटेज आणि खुर्चीची हाव"!

भाऊसाहेबांचा मगो पक्ष हा तळागळातील लोकांचा होता. सद्याचा मगो पक्ष हा माधवरावांच्या गोठ्यातला पक्ष झालेला आहे. जर तुम्हाला हिंमत असेल तर अध्यक्षपद जीत आरोलकरांना देऊन दाखवा. आम्हाला ह्या लोकांची गरज नाही. शिरोडा मतदारसंघात जाऊन मी ह्यांचा पराभव केलाय. एकेकाळी हेच काँग्रेसचे एजंट म्हणून काम करायचे. यांना पाहिजे फक्त कमिशन, पर्संटेज आणि खुर्ची. शशिकला ताईंवर अंडी फेकणारे हे लोक. मी हे सगळं भोगून ह्यांच्यावर मात करीत राजकारणात यशस्वी झालोय. मंत्री गोविंद गावडेंचा ढवळीकर बंधूंवर घणाघात.

Goa Weather: पावसाचे अपडेट; गोव्याला पुन्हा यलो अलर्ट

IMD ने गोव्यासाठी 3 एप्रिल 2025 पर्यंत यलो अलर्ट जारी केला आहे. गोव्यातील निर्जन ठिकाणी 40-50 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह गडगडाटी वादळ येण्याची शक्यता आहे.

Drawning Case: साळावली कालव्यात 57 वर्षीय वृद्धाचा बुडून मृत्यू

कुडतरी सांगे येथे एक दुःखद घटना घडली असून त्यात प्रकाश गावकर (57) स्थानिक रहिवाशांचा साळावली कालव्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली असून त्यांनी कालवा रस्ता अडवून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यापूर्वीही अशाच घटना घडल्या आहेत.

Goa Strike: धरणे आंदोलन..!

आम्हाला कामावर घ्या. अशी मागणी करत कामावरून कमी केलेल्या 'नेस्ले'च्या कंत्राटी कामगारांचे धरणे आंदोलन. म्हावळींगे येथील कंपनीच्या गेटबाहेर आंदोलन. राष्ट्रीय मूळनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या बॅनरखाली आंदोलन. न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही. आंदोलनकर्त्या कामगारांचा निर्धार.

Pernem News: कोरगाव येथे पेडणे ईद उल फितरसाठी मुस्लिम बांधव एकत्र

कोरगाव येथे पेडणे ईद उल फितर (रमजान) साजरा केला जातो. या प्रसंगी पेडणे तालुक्यातील मुस्लिम बांधव एकत्र येतात आणि नमाज अदा करतात. आज यावेळी कोरगावचे स्थानिक व सरपंच अब्दुल नाईक बोलत होते.

Eid in Goa: वाळपई आणि गोव्यात ईद-उल-फित्र मोठ्या उत्साहात साजरा केला

वाळपई आणि गोव्यातील मुस्लिम समुदायाने मोठ्या उत्साहात आणि उत्साहात ईद-उल-फित्र साजरा केला. हा महत्त्वपूर्ण सण रमजानचा शेवट, इस्लामी उपवासाचा पवित्र महिना आणि आध्यात्मिक चिंतन, कृतज्ञता आणि आनंदाचा काळ आहे.

Eid 2025: ईद मुबारक..!

डिचोलीत 'ईद-उल-फित्र' चा उत्साह. शेकडो मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत ऐतिहासिक 'निमुजगा' येथे नमाज.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

10 लाखांचं 800 लिटर अवैध डिझेल जप्त, 5 जणांच्या आवळल्या मुसक्या; मांडवी किनारी गोवा पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

Goa Fraud Case: प्रोजेक्टमध्ये 'गुंतवणुकीचे' आमिष दाखवून गोव्यातील एकाला 1.32 कोटींचा गंडा; केरळमधील दोघांविरोधात गुन्हा दाखल

LIC Scheme: दिवाळीपूर्वी 'एलआयसी'ची मोठी भेट, 15 ऑक्टोबरपासून सुरु करणार 2 खास योजना; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

रस्त्यावर चूल मांडणं पर्यटकांना भोवलं, ना पोट भरलं, ना खिशाला परवडलं!! वाचा नेमकं काय घडलं?

मडगाव रवींद्र भवनचे नूतनीकरण अंतिम टप्प्यात; 30 ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण! Video

SCROLL FOR NEXT