live updates Marathi Goa Dainik Gomantak
गोवा

Goa News: श्रीमंत दामोदर पंत नाट्य प्रयोगावेळी कला अकादमीच्या दिनानाथ मंगेशकर सभागृहाच्या वातानुकूलित यंत्रणेत बिघाड

Today's Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील ठळक घडामोडी

Akshata Chhatre

Kala Academy Goa: श्रीमंत दामोदर पंत नाट्य प्रयोगावेळी कला अकादमीच्या दिनानाथ मंगेशकर सभागृहाच्या वातानुकूलित यंत्रणेत बिघाड

भरत जाधव यांच्या श्रीमंत दामोदर पंत या नाट्य प्रयोगावेळी कला अकादमीच्या दिनानाथ मंगेशकर सभागृहाच्या वातानुकूलित यंत्रणेत बिघाड झाल्याने प्रेक्षक नाराज. यापूर्वी शरद पोंक्षे यांच्या पुरूष नाटकावेळी प्रकाश योजनेत झाला होता बिघाड.

Goa News: श्री भूमिका देवस्थानचा वर्धापन दिन कोणी साजरा करावा?

आश्वे मांद्रे येथील श्री भूमिका देवस्थानचा २१रोजी वर्धापन दिन तो कोणी साजरा करावा या संबंधी दोन गटात वाद सुरू,मामलेदार पोलीस घटनास्थळी तैनात,

तामसुली-खांडोळा येथे घराच्या बाजूला असलेल्या शेडला आग, जीवीतहानी टळली

तामसुली-खांडोळा येथे घराच्या बाजूला असलेल्या शेडला रविवारी (20 एप्रिल) सकाळी आग लागली. कुंडई अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झाली नाही.

Shravan Barve Murder: श्रवण बर्वे खून प्रकरणात पोलिसांचा मोठा खुलासा 

Goa Accident: केपे येथे अपघात; २ जण जखमी

केपेमधील बोरीमोल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सजवळ दोन दुचाकींमध्ये अपघात झाला. दोन्ही चालक जखमी झाले. क्वेपेम पोलिस पंचनामा करत आहेत.

Goa News: शिर्डी येथे देव दर्शनाला जाताना दुर्दैवी मृत्यू

नईबाग पेडणे येथील भगवान उत्तम कासकर या युवकाचा शिर्डी येथे देव दर्शनाला जाताना सातारा येथे रात्री अपघातात मृत्यू. वाढदिवसा आदल्या दिवशीच काळाचा घाला.

Goa Education: श्री हनुमान विद्यालय वाळपई येथे NEP 2020 जनजागृती कार्यक्रम मोठ्या उत्साहात

श्री हनुमान विद्यालय, वाळपई येथे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 (NEP 2020) यावर आधारित माहितीपूर्ण जनजागृती कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. रूपेश सावंत (राज्य समन्वयक, NEP 2020), वाळपई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नरहरी हळदणकर, व्यवस्थापक देवेश पेडणेकर, मुख्याध्यापिका सौ. मेघना मेघनाथ मांद्रेकर, कार्यवाह विश्वास कावळेकर, पालक शिक्षक संघाचे अध्यश्र उमेश कुलकर्णी, सचिव सौ. निधी विनीत जोशी यांचा समावेश होता.

Goa Crime News: पेडणे पोलिसांना हरवलेला मोबाईल आणि रोख रक्कम शोधण्यात यश

शनिवारी (दि.१९) पर्वरी येथील एसीडीआयएल शाळेजवळ रस्त्यावर आढळलेल्या टेक्नो कॅमन १९ मोबाईल फोन आणि २,७०० रुपयांच्या रोख रकमेच्या मालकाला पोचवण्यात यशस्वी झाले. पडताळणी आणि चौकशीनंतर, हे सामान योग्य मालक, टँकर चालक श्री शिव भजन पांडे यांच्याकडे सोपवण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यात धर्मांतरविरोधी कठोर कायदा करा; हिंदू राष्ट्र समन्वय समितीची मागणी

Government Employees: वृद्ध पालकांच्या देखभालीसाठी सरकारी कर्मचारी घेऊ शकतात 30 दिवसांची रजा, केंद्रीय मंत्र्यांनी राज्यसभेत स्पष्टच सांगितलं

Viral Video: नवा जुगाड, नवा व्हिडिओ! सोशल मीडियावर धुमाकूळ, तुम्हीही म्हणाल, 'क्या बात है!'

'म्हादई आमची लढाई, आमचे आम्हाला मिळत नाही तोवर विश्रांती नाही'; प्रमोद सावंत यांच्या वक्तव्यानंतर DK शिवकुमारांचा इशारा

August 2025 Horoscope: मेष ते मीन... ऑगस्टमध्ये 'या' 5 राशींच्या कुंडलीत अशुभ योग, खर्च आणि तणावात वाढ!

SCROLL FOR NEXT