Goa Rain Dainik Gomantak
गोवा

Goa News: राज्यात पावसाचं धूमशान, विविध ठिकाणी पावसामुळे पडझड

Today's Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील ताज्या आणि ठळक घडामोडी मराठीमध्ये

गोमंतक ऑनलाईन टीम

'कला राखणीची' सुपारी न घेताच मंत्री गावडे निघाले

मंत्री गोविंद गावडे यांनी म्हटले होते की, आम्ही कला अकादमी बदनाम करण्याची सुपारी घेतली आहे. मात्र, आम्ही कलाकार ‘कला राखणी’ची सुपारी घेऊन आलो होतो. तीच सुपारी आम्ही मंत्र्यांना देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी ती स्वीकारली नाही आणि ते तिथून निघून गेले : कला राखण मांड

म्हापसा येथे भिंत कोसळल्याने दोन स्कूटर उद्ध्वस्त

सरकारची नवी आर्थीक सहाय्य योजना ऊस शेतकऱ्यांना अमान्य!

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारची नवी आर्थीक सहाय्य योजना अमान्य. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता नॉटीफीकेशन काढण्यात आले आहे. पुर्वीच्या योजनेनुसार सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीप्रमाणे सरकारने आर्थीक सहाय्य कायम ठेवावे. भविष्यात संजीवनी कारखाना सुरु होणार की नाही हे सरकाराने स्पष्टपणे शेतकऱ्यांना सांगावे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीनंतर सरकारकडे मागणी.

गोव्यात पावसाचा दणका; Watch Video

गोव्यासाठी रेड अलर्ट; मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज

आयएमडीने आज गोव्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. २२ आणि २३ मे २०२५ रोजी ऑरेंज अलर्ट. २४ मे ते २७ मे २०२५ रोजी यलो अलर्ट. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज.

"लोकांच्या सुरक्षेसाठी आम्ही उपक्रम राबवत आहोत, लोकांनी याचा वापर करावा" मंत्री माविन गुदिन्हो

गोव्यात महिला आणि मुलांचे सक्षमीकरण आणि संरक्षण करण्यासाठी गोवा पोलिस आणि स्कॅन - गोवा यांच्या सहकार्याने पणजी शहर महामंडळाचा एक उपक्रम राबविण्यात आला आहे. प्रवास करत असताना महिला किंवा मुलीला सुरक्षित असं वाटलं पाहिजे आणि यासाठी पणजीतील बस, टॅक्सी आणि रिक्षा यावर लोकांच्या सुरक्षितेसाठी हेल्पलाइनचे स्टिकर चिकटवण्यात आले आहे. या स्टिकर वर वेगवेगळ्या हेल्पलाइन नंबर देण्यात आले आहेत. 112 डायल केल्याने पोलिसांपर्यंत पोहोचू शकतो. हे लोकांच्या सुरक्षेसाठी आम्ही उपक्रम राबवत आहोत जोपर्यंत लोकांना यासारखे उपक्रम कळत नाही तोपर्यंत घटना घडत राहणार म्हणून लोकांनी याचा वापर करावा असं मंत्री माविन गुदिन्हो

नामवंत नाट्य कलाकार सतीश नार्वेकर यांना गोपीनाथ सावकार स्मृती पुरस्कार जाहीर

द गोआ हिंदू अससोसिएशन तर्फे देण्यात येणार श्री गोपीनाथ सावकार स्मृती पुरस्कार २०२५ गोव्याचे नामवंत नाट्य कलाकार श्री गंगाराम उर्फ सतीश नार्वेकर यांना जाहीर.

पेडणे कासारवरने गावातील राष्ट्रीय येथील वडाचे झाड कोसळून रस्ता बंद

पेडणे कासारवरने गावातील राष्ट्रीय येथील वडाचे झाड कोसळून रस्ता बंद झाला होता. तो अग्निशामक दल आणि स्थानिकाच्या सहाय्याने मोकळा करण्यात यश आले. त्यात पार्किंग केलेल्या एका मारुती व्हॅनची काही प्रमाणात नुकसानी झाली. रात्री बरोबर चार वाजता वडाचे झाड कोसळले.

ट्रक अडवून ठेवले, मात्र अजून कोणतीच कारवाई नाही?

गुळेली सत्तरीतून गुलबर्गा, कर्नाटक येथे जाणारे तीन 16 चाकी ट्रक वाळपई पोलिसांनी पकडून ते होंडा आवटपोस्टच्या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. ह्या ट्रकमध्ये चिऱ्यांचे दगड (लोब्रा) असल्याची माहिती. मात्र तीन दिवसांपासून अडवून ठेवलेल्या ट्रकांवर कोणतीच पुढील कारवाई पोलिसांकडून सुरु करण्यात आली नसल्याची सुत्रांची माहिती.

या पावसाळ्यात पणजीमध्ये कुठलीही काळजी करण्यासारखं कारण नाही

या पावसाळ्यात पणजीमध्ये कुठलीही काळजी करण्यासारखं कारण नाही आहे. धोकादायक झाडांबद्दल बोलायचे झाले तर ३५० धोकादायक झाडांपैकी फक्त १५० झाडे तोडायची आहेत. आम्ही जीईसीशी बोललो आहोत त्यांनी आम्हाला सुमारे २० धोकादायक इमारतींची यादी पाठवली आहे. अशी माहिती रोहित मोंसेरेत यांनी दिली

आश्वे मांद्रे जोरदार पाऊस,गटार व्यवस्था कोलमडली

आश्वे मांद्रे जोरदार पाऊस,गटार व्यवस्था कोलमडली,पाणी रस्त्यावर,वीज वाहिन्यांवर घसरण विजेची लखलख.

"गोव्याची प्रतिमा खराब होत आहे" मंत्री माविन गुदिन्हो

'टॅक्सी, रेंट-अ-कार, हॉटेल्स, एअरलाइन्स - हे सर्व गोव्याची प्रतिमा खराब करत आहेत' मंत्री माविन गुदिन्हो

पावसाचा जोर वाढल्याने लाखेरे येथे घरांनी घुसले पाणी

पावसाचा जोर वाढल्याने लाखेरे येथे घरांनी घुसले पाणी; लोकवस्तीशेजारील नाला तुंबल्यामुळे नागरिकांना त्रास.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT