Shrawan Somwar: Dainik Gomantak
गोवा

Shrawan Somwar: हरवळे रूद्रेश्वर देवस्थानात आज श्रावणी सोमवार

विविध कार्यक्रम: मान्यवरांची उपस्थिती

दैनिक गोमन्तक

Shrawan Somwar: गोमंतकीय भंडारी समाजाचे आराद्य दैवत,हरवळे डिचोलीतील श्री रुद्रेश्वर देवस्थानात ११ सप्टेंबर रोजी श्रावण मासानिमित्त शेवटचा सोमवार विविध धार्मिक विधींनी साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्यास गोव्यातील मंत्री, आमदारांना खास निमंत्रित केलेले आहे.

दुपारी १.३० वा. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, कृषिमंत्री रवी नाईक, कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे, सहकार मंत्री सुभाष शिरोडकर, मंत्री सुभाष फळदेसाई, मंत्री नीलकंठ हळर्णकर, आमदार विजय सरदेसाई, आमदार चंद्रकांत शेटये, आमदार प्रेमेंद्र शेट, आमदार जीत आरोलकर, आमदार प्रवीण आर्लेकर, आमदार वीरेश बोरकर, व डिचोली उपजिल्हाधिकारी रोहन कासकर खास उपस्थित राहून रुद्रेश्वर देवास दुग्धाभिषेक करणार आहेत. यावेळी सर्व निमंत्रित पाहुण्यांना देवस्थानतर्फे श्रीफल, रुद्रेश्वर प्रतिमा देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

पहिला अभिषेक पहाटे ४.३० वा.देवस्थान अध्यक्ष यशवंत माडकर करणार असून त्यानंतर ५ वाजता मुक्तद्वार महापर्वणीस सुरू होणार आहे. भाविकांना दुपारी १२ वाजेपर्यंत श्री रुद्रेश्वर देवास स्वहस्ते अभिषेक करता येईल. त्यानंतर आरती,तिर्थप्रसाद व महाप्रसाद होईल. व रात्री ८ वा. श्रींच्या पालखीने श्रावणी सोमवारची सांगता होणार आहे ,असे आयोजन समिती अध्यक्ष आश्विनकुमार नाईक यांनी कळवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Africa Bar Shooting: बारमध्ये एन्जॉय करत होते लोक, अचानक अंदाधुंद गोळीबार; 17 जणांचा मृत्यू, 15 जखमी VIDEO

कुणबी साडीवर दावा कुणाचा?

Porvorim Flyover: पर्वरी येथील उड्डाणपुलावर स्पीड कॅमेरे असतानाही उल्लंघन, 10 दिवसांत 580 वाहनांनी ओलांडली वेगमर्यादा

Kushavati Mock Drill: 'कुशावती'त चार ठिकाणी 'मॉक ड्रिल', आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सराव; प्रशासन तपासणार यंत्रणांची सज्जता

GMC Resident Doctors: निवासी डॉक्टरांसाठी 'गार्ड'ची लढाई, स्टायपेंड वाढीसह 'गोमेकॉ'तील डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT