गोव्याचे मुख्यमंत्री डॉ, प्रमोद सावंत यांनी आज गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. दयानंद बांदोडकर यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केले. संदीप देसाई
गोवा

स्व. दयानंद बांदोडकर गोमंतभूमीने पाहिलेल्या मुख्यमंत्र्यांचे मेरुमणी होते

दैनिक गोमन्तक

गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद तथा भाऊसाहेब बांदोडकर यांची आज पुण्यतिथी. 20 डिसेंबर 1963 रोजी त्यानी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला आणि काळाने त्याना आपल्यापासून हिरावून नेईपर्यंत म्हणजे 12 ऑगस्ट 1963 पर्यंत ते मुख्यमंत्रीपदी राहिले; अपवाद फक्त 2 डिसेंबर 1966 ते 5 एप्रिल 1967 असे 127 दिवस गोव्यावर लादलेल्या राष्ट्रपती राजवटीच्या कालावधीचा. आजपर्यंत गोमंतभूमीने पाहिलेल्या मुख्यमंत्र्यांचे ते मेरुमणी होते. (Today is death anniversary of first Chief Minister of Goa Dayanand Bandodkar)

गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. दयानंद बांदोडकर यांचे समाधी स्थळ

मीरामार येथील गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. दयानंद बांदोडकर यांचा पुण्यतिथी निमित्त त्याच्या समाधीवर विविध फुलापानानी सजावट करण्यात आली.

गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. दयानंद बांदोडकर यांचे समाधी स्थळ

मीरामार येथील गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. दयानंद बांदोडकर यांचा समाधीवर फुलांची सजावट करतांना वेळगे येथील श्रीमती हायस्कुलचे शिक्षक

गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. दयानंद बांदोडकर यांचे समाधी स्थळ

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ, प्रमोद सावंत यांनी आज गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. दयानंद बांदोडकर यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केले.

गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. दयानंद बांदोडकर यांचे समाधी स्थळ

गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण व्हावे असे बांदोडकरांचे आरंभीच्या काळात जरी मत असले तरी जनमत कौलातून गोव्याच्या जनतेने दिलेला जनादेश त्यानी शिरोधार्य मानला आणि त्यानंतरच्या काळात ते गोव्याच्या सर्वांगीण विकासासाठी दिवस- रात्र वावरले.

गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. दयानंद बांदोडकर यांचे समाधी स्थळ

विकसित गोव्याचे स्वप्न पाहून ते साकारण्यासाठी सर्वस्व झोकून देणारा हा नेता होता. मुख्यमंत्री असलो तरी आपण सर्वज्ञ नाही हे जाणून आपल्या कुशल अधिकाऱ्यांच्या सूचनांचा आदर करण्याचे तारतम्य त्यांच्याठायी होते.

गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. दयानंद बांदोडकर यांचे समाधी स्थळ

गोव्याच्या भाग्यविधात्या पहिल्या मुख्यमंत्र्यांचे या भूमीसाठीचे भरीव आणि सकारात्मक योगदान काय होते याची जाणीव आज विद्यार्थीवर्गांत झिरपायला हवी. भाऊसाहेब विस्मृतीत ढकलले जाऊ नयेत. आजच्या गोव्याची विदारक अवस्था पाहून तो महान नेता आपल्या स्वर्गीय सुखासीन वास्तव्यातही अस्वस्थपणे तळमळत असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: गोवा काँग्रेसच्या प्रभारी सचिवांचा बैठकांचा धडाका; 'त्या' आमदारांना प्रश्न विचारण्याचे आवाहन

Sunburn Festival 2024: त्यांनी कॅप्टनसारखे वागावे, बिनबुडाची विधाने करू नये; ‘सनबर्न’ याचिकेवरुन खंवटेंचे प्रत्त्युत्तर

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Bhoma Highway: 'भोम प्रकल्प' गोव्याच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा! भाजपने मानले गडकरींचे आभार

Goa Traffic Department: सावधान! गोव्यात येताय? आता हेल्मेट नसल्यावर होणार 'ही' कारवाई

SCROLL FOR NEXT