Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa News: कोमुनिदाद संस्थांनी न्यायालयात न जाता सहकार्य करावे, मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले; वाचा दिवसभरातील घडामोडी

Today's Goa Marathi Breaking News: गोव्यातील राजकारण,क्रीडा,मनोरंजन आणि इतर महत्वाच्या घडामोडी.

गोमंतक ऑनलाईन टीम

उसगाव मार्केटला दिवंगत मुख्यमंत्र्यांचे नाव देणार

रवी नाईक यांचा वारसा जिवंत: उसगाव मार्केटला दिवंगत मुख्यमंत्र्यांचे नाव देण्यात येणार

कोमुनिदाद संस्थांनी न्यायालयात न जाता सहकार्य करावे - मुख्यमंत्री

कोमुनिदादच्या जागेत लोकांनी बांधलेली घरे हि सरकारच्या मान्यतेने नव्हे तर कोमुनिदाद संस्थेतील लोकांच्याच मान्यतेने उभारलेली आहेत. या लोकांना त्यांची घरे कायदेशीर करण्यासाठी गोव्यातील सर्व कोमुनिदाद संस्थांनी सरकारला सहकार्य करावे, त्यांच्या विरोधात न्यायालयात जाऊ नये. या घरमालकांकडून त्याबदल्यात मोबदला सरकार वसूल करून देण्यास तयार आहे. केवळ कोणाचीही घर जमीनदोस्त होऊ नये हाच या मागचा उद्देश आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे माझे घर योजनेच्या अर्ज वितरण कार्यक्रमात बोलताना केले

ओंकार हत्तीने तेरेखोल नदी पोहून महाराष्ट्रातील वापोल गावात प्रवेश

ओंकार हत्तीने तेरेखोल नदी पोहून महाराष्ट्रातील वापोल गावात प्रवेश केला. वाहत्या पाण्यातून पलीकडे सुरक्षितपणे पोहोचण्यापूर्वी हा भव्य प्राणी कसा चालतो हे पाहण्यासाठी स्थानिक लोक नदीकाठावर जमले होते.

गोव्यात ओशनमन कार्यक्रम स्थगित

कारंझाळे बीचवर मच्छिमारांशी झालेल्या संघर्षानंतर गोव्यात ओशनमन कार्यक्रम स्थगित

गोव्यासाठी 29 ऑक्टोबरपर्यंत यलो अलर्ट जारी

भारतीय हवामान विभागाने (IMD) गोव्यासाठी २९ ऑक्टोबरपर्यंत यलो अलर्ट जारी केला आहे. उत्तर आणि दक्षिण गोव्यात ३०-४० किमी/ताशी वेगाने विजांचा कडकडाट आणि ५० किमी/ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने जनतेला सावधगिरी बाळगण्याचा, विजांच्या कडकडाटादरम्यान मोकळ्या जागेत जाण्यापासून दूर राहण्याचा आणि समुद्रात जाण्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे कारण परिस्थिती कठीण असू शकते. जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी रहिवाशांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुळगाव पंचायतीच्या ग्रामसभेत 'मायनींग'चा विषय पुन्हा ऐरणीवर

मुळगाव पंचायतीच्या ग्रामसभेत 'मायनींग'चा विषय पुन्हा ऐरणीवर. क्रीडामैदानाचा विषयही चर्चेत. सरपंचांसह सर्व पंचसदस्य ग्रामसभेला उपस्थित. गावचे नागरिक तथा दिवंगत स्वातंत्र्यसैनिक जयराम राऊत यांना ग्रामसभेत श्रद्धांजली.

"आम्ही गावाच्या विकासासाठी लढतो"

आम्ही सत्तेसाठी नाही, तर आमच्या गावाच्या विकासासाठी लढतो: विश्वजित राणे

खासगी कार्यक्रमाला परवानगी; कारंझाळे समुद्रकिनाऱ्यावर तणाव

स्थानिक मच्छिमारांना अडथळा ठरणाऱ्या एका खाजगी कार्यक्रमाला सरकारने परवानगी दिल्यानंतर कारंझाळे समुद्रकिनाऱ्यावर तणावपूर्ण परिस्थिती

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे लढणार निवडणूक!

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) २०२७ च्या गोवा विधानसभा निवडणुका युती न करता स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VHT 2025-26: विजय हजारे ट्रॉफीचा थरार! मुंबई-दिल्लीसह 8 संघ सज्ज; पाहा उपांत्यपूर्व फेरीचं संपूर्ण वेळापत्रक

Mardol: सफर गोव्याची! तळीजवळ गेल्यावर स्वच्छ, थंड हवा फुफुस्सांत पसरते; निसर्गसंपन्न 'म्हार्दोळ'

Madhav Gadgil: पर्यावरणाचा प्रखर प्रहरी, पश्चिम घाटांचे शिल्पकार डॉ. माधव गाडगीळ काळाच्या पडद्याआड

Vijay Hazare Trophy: गोव्याची झुंज अपयशी! 'विजय हजारे ट्रॉफी'त महाराष्ट्राचा 5 धावांनी विजय, ऋतुराजची शतकी खेळी पडली 'महागात'

eSakal Comscore: मराठी मीडियात 'ई-सकाळ'चा डंका! 19.5 मिलियन युजर्ससह ठरली देशातील नंबर वन वेबसाइट

SCROLL FOR NEXT