Today goa Four students Return from Ukraine  Dainik Gomantak
गोवा

युक्रेनमधून आणखी चार गोमंतकीय विद्यार्थी मायदेशी सुखरूप

अद्यापही चार विद्यार्थी देशाबाहेर

दैनिक गोमन्तक

मडगाव : युक्रेनमध्ये अडकलेल्या गोमंतकीय विद्यार्थ्यांपैकी आणखी चार विद्यार्थीनी आज सुखरूप मायदेशी परतल्या आहेत. आता पर्यंत 17 गोमंतकीय विद्यार्थी मायदेशी परतले असून तिघेजण अजूनही युक्रेन जवळच्या देशात आहेत. तर एक विद्यार्थी अद्यापही युक्रेनमध्ये (ukraine) अडकून पडला आहे.

आज भारतात पोहोचलेल्या विद्यार्थ्यांमध्ये फोंडा (Ponda) येथील क्रिशा मिस्त्री व दीपिका पाटील तर कुडतरी येथील प्रतापमहिमा मोनिका या विद्यार्थीनी असून गोव्याच्या विद्यार्थ्यांबरोबर आलेल्या चैताली संझगिरी या विद्यार्थिनीने दिल्लीत महाराष्ट्र सदनचा आसरा घेतला अशी माहिती प्राप्त झाली आहे.

एनआरआय खात्याचे संचालक अँथनी डिसोझा यांनी दिलेल्या माहितीनुसार आता पर्यंत 17 गोमंतकीय विद्यार्थी मायदेशी परतले आहेत. तर अद्यापही चार विद्यार्थी देशाबाहेर आहेत. त्यापैकी तिघेजण युक्रेनची सीमा ओलांडून रोमेनिया, हंगेरी व पोलंड या देशात आहे.

बाणावली (Benaulim) येथील जेडन परेरा हा 19 वर्षीय विद्यार्थी अजून युक्रेनमध्ये अडकून पडलेला आहे. सुमी या युद्धजन्य भागात तो अडकल्यामुळे त्याला आणि तिथे असलेल्या अन्य भारतीयांना बाहेर काढणे कठीण झाले असल्याची माहिती मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT