Tata Memorial Hospital student Dainik Gomantak
गोवा

TATA Hospital : टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या मुलांनी दिली ‘बिग फूट’ संग्रहालयाला भेट

TATA Hospital : अन्य विविध वस्तू, गोव्याचा वारसा दर्शविणाऱ्या वस्तू पाहूनही मुले प्रभावित झाली.

गोमन्तक डिजिटल टीम

TATA Hospital : पणजी, मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या बालरोग चिकित्सा ऑन्‍कोलॉजी वॉर्डमधील ३० मुलांनी नुकतीच लोटली येथील ‘बिग फूट’ या संग्रहालयाला गोवा दौऱ्याचा भाग म्हणून भेट दिली.

या मुलांच्या या भेटीचे वैशिष्ट्य ठरले ते बिग फूट संग्रहालयाचे जनक महेंद्र अाल्वारिस यांच्याशी साधलेला संवाद. तेथे ठेवण्यात आलेले संत मीराबाईंचे भव्य शिल्प पाहून मुले स्तिमित झाली.

अन्य विविध वस्तू, गोव्याचा वारसा दर्शविणाऱ्या वस्तू पाहूनही मुले प्रभावित झाली. गोवा दौऱ्याची स्मृती म्हणून त्यांना टॅटू देण्यात आला, तर कृतज्ञता म्हणून त्यांनी अाल्वारिस यांना गुलाबपुष्प प्रदान केले.

या मुलांबरोबर त्यांचे पालक तसेच साहाय्‍यक प्रशासकीय अधिकारी संतोष शेरवाडे, अन्य अधिकारी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT