Shripad Naik Dainik Gomantak
गोवा

देशाला आघाडीचे सागरी राष्ट्र बनवणार: श्रीपाद नाईक

‘मरिटाईम इंडिया व्हिजन 2030’ सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट

दैनिक गोमन्तक

पणजी: जगातील आघाडीचे सागरी राष्ट्र म्हणून भारताचे स्थान पुन्हा प्रस्थापित करण्याच्या दिशेने भारत सरकारतर्फे विविध पावले उचलली जात आहेत. भारत सरकारचा `मरिटाइम इंडियन व्हिजन 2030 ` हा `डॉक्युमेंट` भारताने आतापर्यंत सादर केलेल्या सर्वोत्कृष्ट `डॉक्युमेंट`पैकी एक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.

गोरेगाव-मुंबई कालपासून सुरू झालेल्या मरिटाईम ट्रान्सपोर्ट अॅण्ड शिपिंग इंडिया एक्स्पो 2022 कार्यक्रमात नाईक बोलत होते. याप्रसंगी कॅ. केदार चौधरी, ओशनट्रेड मरिटाईमचे व्यवस्थापकीय संचालक अली पाटणकर, ओशनट्रेड मरिटाईमच्या संचालक पल्लवी नाईक उपस्थित होते.

सर्वांत वेगाने वाढणारा मरिटाईम देश असण्याचे महत्त्व सर्वजणांना ज्ञात आहे. 7,500 कि.मी.हून अधिक सागरी किनारपट्टी लाभलेला आपला देश जगातील सर्वांत मोठा सोळावा मरिटाईम देश आहे. भारतातील जहाजबांधणी उद्योग देशाच्या व्यापार आणि वाणिज्यमधील वृद्धीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. पूर्व आशिया, अमेरिका, युरोप आणि आफ्रिका या देशांत जाणारी बहुतेक मालवाहू जहाजे भारतीय प्रादेशिक पाण्यातून प्रवास करत आहेत, असे नाईक यांनी नमूद केले.ओशन ट्रेड मेरिटाईमसारख्या आत्मनिर्भर उद्योगांनी आणि संबंधित उद्योजकांनी तरुण उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय मंत्र्यांनी केले.

संपूर्ण सागरी उद्योगाला एकाच छताखाली आणण्यासाठी शीप बिल्ड इंडिया एक्स्पो समिट आणि मेरीटाइम ट्रान्सपोर्ट अॅण्ड शिपिंग इंडिया एक्स्पोसारखे कार्यक्रम महत्त्वाचे आहेत.

- श्रीपाद नाईक, केंद्रीय मंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT