Goa  Twitter/ @TMCforGoa
गोवा

दिदींच्या दौऱ्यापूर्वी TMC चे फाडले बॅनर, राज्यपालांकडे तक्रार

अभिनेत्री नफिसा अली (Actress Nafisa Ali) आणि लकी अली (Lucky Ali) यांच्या नावाचाही समावेश आहे. ममता बॅनर्जी 2 नोव्हेंबर रोजी गोव्याहून परतणार आहेत.

दैनिक गोमन्तक

तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal Chief Minister Mamata Banerjee) यांचा गोवा दौरा 28 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. गोव्यातील त्यांच्या वास्तव्यादरम्यान एकामागून एक सरप्राईज मिळणार असल्याचे समोर येत आहे. 90 च्या दशकातील प्रसिध्द बॉलिवूड अभिनेत्री वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) तृणमूल काँग्रेसमध्ये सामील होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या यादीत अभिनेत्री नफिसा अली (Actress Nafisa Ali) आणि लकी अली (Lucky Ali) यांच्या नावाचाही समावेश आहे. ममता बॅनर्जी 2 नोव्हेंबर रोजी गोव्याहून परतणार आहेत.

दरम्यान, पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच होणाऱ्या चाळीस सदस्यीय गोवा विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी टीएमसीने गोव्यात तयारी सुरु केली आहे. गोव्यातील काँग्रेस नेत्यांना पक्षात सामील केल्यानंतर आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी 28 ऑक्टोबरला गोव्याच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत. ममता बॅनर्जी यांच्या गोवा दौऱ्यापूर्वी बॅनर आणि पोस्टर्स फाडल्याचे आणि पोस्टर्सवर काळे फासल्याचे आरोप टीएमसी नेत्यांनी भाजपवर केला आहे. दरम्यान, गोवा टीएमसीने राज्यपालांना निवेदन देऊन भाजप सरकार हटवण्याची मागणी केली असून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी देखील केली आहे.

ममता बॅनर्जी यांच्या गोवा दौऱ्यापूर्वी माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो (Union Minister Babul Supriyo) आणि भाजपमधून टीएमसीमध्ये दाखल झालेले खासदार सौगता रॉय (Saugata Roy) गोव्यात पोहोचले आहेत. तिकडे गोवा तृणमूल काँग्रेस नेत्यांच्या सहकार्याने ममता बॅनर्जींच्या गोवा दौऱ्यासाठी रणनीती आखत आहे. टीएमसीने गोव्यातील भाजप सरकारवर हल्ला चढवला आहे.

ममता बॅनर्जी सध्या उत्तर बंगालच्या दौऱ्यावर आहेत. उत्तर बंगालच्या दौऱ्यावरुन परतल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख 28 ऑक्टोबरला गोव्याला रवाना होतील. गोव्यात त्या पक्षाच्या नेत्यांची बैठक घेणार आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने दणदणीत विजय मिळवल्यानंतर, राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा रुंदावण्याचा आणि भारतीय जनता पक्ष (BJP) शासित गोवा आणि त्रिपुरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे.

तसेच, तृणमूल कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले की, "ममता दीदी युतीसाठी छोट्या पक्षांच्या काही नेत्यांना भेटू शकतात. परंतु त्या त्यांना आपल्या पक्षात सामील होण्यासाठी आमंत्रित करु शकतात." त्याचबरोबर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या गोवा दौऱ्यादरम्यान, बॉलीवूड अभिनेत्री वर्षा उसगावकर, लकी अली आणि नफिसा अली सारख्या बॉलीवूड स्टार देखील टीएमसीमध्ये सामील होऊ शकतात, असही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

दुसरीकडे, गोवा टीएमसीने राज्यपालांना निवेदन देत सावंत सरकारला हटवण्याची मागणी केली आहे. भाजप आणि काँग्रेसच्या पश्चिम बंगालमधील युनिटने बॅनर्जी यांच्या गोवा दौऱ्याचा खरपूस समाचार घेत त्यांच्या दौऱ्याचे वर्णन "किनारी राज्याचे राजकीय पर्यटन" असा केला आहे. केले. शिवाय, भाजपच्या पश्चिम बंगाल युनिटचे प्रवक्ते शमिक भट्टाचार्य म्हणाले, "गोव्याचे हवामान आता पर्यटकांसाठी अनुकूल आहे. आणि ममता बॅनर्जी सुट्टीचा मनमुराद आनंद घेण्यासाठी तिथे जात आहे.” ममता बॅनर्जीं यांचे पोस्टर फाडल्याचा भाजपवरील आरोप फेटाळून लावत ते म्हणाले की, 'TMC ने आधी गोव्यात आपले जनमत तयार करायला सुरुवात करावी आणि मगच असे आरोप करावे'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

VIDEO: "...अन् डोळ्यासमोर अंधारीच आली!" मेलबर्नमध्ये मोहम्मद रिझवानची फजिती; नाजूक जागी चेंडू लागताच मैदानात उडाली खळबळ

Mangal Gochar 2026: नशिबाची साथ अन् पैशांची बरसात! मंगळ ग्रहाच्या गोचरमुळे 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; गुंतवणूकीतून मिळणार मोठा परतावा

SCROLL FOR NEXT