Scam Mafia Dainik Gomantak
गोवा

Scam Mafia: टीएमसीचा हल्लाबोल; विश्वजित राणे 'घोटाळा माफिया'

तृणमूल कॉंग्रेसने या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री विश्वजित राणेंबाबत आरोपांची मालिकाच सुरू केली आहे.

दैनिक गोमन्तक

Scam Mafia: तृणमूल कॉंग्रेस विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर राजकीय नेत्यांवर हल्लाबोल करताना दिसत आहे. मागील काही दिवसांपूर्वी त्यांनी कॉंग्रेस नेते आणि माजी मंत्री मायकल लोबो यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. लोबो ही गुन्हेगार असून आता भाजपबरोबरच कॉंग्रेसनेही गुन्हेगारांना आश्रय आणि निवडणुकीचे तिकीट द्यायला सुरुवात केली असल्याचा घणाघात त्यांनी केला होता. आता असेच गंभीर आरोप तृणमूल कॉंग्रेसने (Trinamool Congress) आरोग्यमंत्री विश्वजित राणे (Vishwajit Rane) यांच्यावर केले आहेत.

या आरोपांसंदर्भात टीएमसीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये लोक राणेंविरोधात 'विश्वजित राणे मुर्दाबाद!', 'गली-गली में शोर है, विश्वजित राणे चोर है!' अशी घोषणाबाजी करताना दिसत आहेत. याचबरोबर राणे यांनी आरोग्यविभागात भ्रष्टाचार केला असल्याचे लोक आणि गोव्यातील विविध राजकीय नेते म्हणत आहेत. डॉ. वेंकटेश म्हणाले की, 'विश्वजित राणे यांनी वेंटीलेटर संदर्भात तब्बल 2000 कोटींचा घोटाळा (Scam) केला आहे. आणि याबाबतीत राणेंनी गुन्हे कबूल करून राजीनामा द्यावा', अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

विश्वजित राणे हे 'घोटाळा माफिया' असल्याचे टीएमसीने म्हटले आहे. शिवाय त्यांनी सत्तरीमधील लोकांची घरबाबत फसवणूक केली असून, ते सतत आपले रंग बदलत असतात असाही त्यांच्याविरोधात उल्लेख आहे. राणें जीएमसी (GMC) नोकरभरतीतही खूप मोठा घोटाळा केला असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Elections 2022) पार्श्वभूमीवर मागील काही दिवसात विविध पक्षातील नेत्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे एकंदरीत पाहता तृणमूलची ताकद बऱ्याच प्रमाणात वाढली आहे. या निवडणुकीत तृणमूल पक्षच विजयी होणार असल्याचा दावा पक्षाने केला आहे. आणि याचसाठी पक्षातर्फे विरोधकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहे. तृणमूलने विश्वजित राणेंवर केलेल्या या आरोपांमुळे या निवडणुकीत त्यांच्या मतांवर परिणाम होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. यावर राणेंची नेमकी प्रतिक्रिया काय असणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FIFA World Cup 2026: मेक्सिकोची बाद फेरी निश्चित, गोलरक्षक किम सेऊंगची चूक दक्षिण कोरियाच्या मुळावर

खरी कुजबुज: शिवसेनेची शर्यत!

Goa Tourism: देशांतर्गत पर्यटकांचा ओघ कायम, मे महिन्यात 4.53% वाढ; 46.39 लाख पर्यटकांची नोंद

Curchorem: आता कुडचडेतील ओहोळात मृत मासे, कचरा प्रक्रिया प्रकल्पातील पाण्याच्या परिणामाचा स्थानिकांचा आरोप

Goa Politics: उमेदवारीचे निकष, रणनीतीही ठरणार; भाजप राज्य कार्यकारिणीची आज बैठक

SCROLL FOR NEXT