Luizinho Faleiro Dainik Gomantak
गोवा

लुईझिनना फातोर्ड्यातून उमेदवारी देण्याचा हेतू काय?

खासदारकी असताना तृणमूल काँग्रेसने निवडणुकीत उतरवण्यामागचे कोडे उलगडेना

दैनिक गोमन्तक

फोंडा : माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांना तृणमूलने फातोर्ड्याची उमेदवारी देणे, हा एक जबरदस्त ‘मास्टर स्ट्रोक’ मानला जात आहे. लुईझिन हे सातवेळा कॉंग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आलेले आमदार. मुख्यमंत्री पदापर्यंत त्यांनी झेपही घेतली आहे. चार महिन्यांपूर्वी त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन तृणमूलमध्ये प्रवेश केला. त्याचे फळ म्हणून त्यांना पश्चिम बंगालातील राज्यसभेची खासदारकी प्राप्त झाली. पण आता अनपेक्षितपणे तृणमूलने त्यांना फातोर्ड्यात गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांच्या विरोधात उतरवून सगळ्यांनाच धक्का दिला आहे. (Luizinho Faleiro News Updates)

फातोर्ड्याचा आणि लुईझिनचा (Luizinho Faleiro) तसा काहीच संबंध नाही. यापूर्वी त्यांनी कधीही मडगाव वा फातोर्ड्यातून निवडणूक लढविलेली नाही. मुख्य म्हणजे खासदार असताना परत राज्याच्या निवडणुकीत उतरविण्याचे प्रयोजन काय? याचे नीट आकलन होत नसले तरी हा तृणमूलच्या रणनीतीचा भाग वाटतो. लुईझिनना जर गोव्याच्या राजकारणात परत उतरवायचे होतेच तर त्यांच्या स्थानिक मतदारसंघातून म्हणजे नावेलीतून उतरवायला हवे होते. पण तिथे आधीच चर्चिल कन्या वालंका यांनी ‘बुकिंग’ केले आहे. त्यांची उमदेवारीही जाहीर झाली आहे. असे असताना परत फातोर्ड्यातून लुईझिनना उतरवून सरदेसाईंवर दडपण आणण्याचा प्रयत्न तृणमूलने केला आहे.

जेव्हा तृणमूलने (TMC) गोव्यात प्रवेश केला, तेव्हा गोवा फॉरवर्डचे तृणमूलमध्ये विलिनीकरण व्हावे, असा प्रस्ताव दिला होता. प्रारंभी या प्रस्तावाला विजयनी होकारही दिला. पण नंतर मतदारांचा विरोध पाहून त्यांनी या प्रस्तावाला पाठ दाखविली होती. या विलिनीकरणाकरिता पश्चिम बंगालहून ममता बॅनर्जी खास गोव्याला आल्या होत्या. पण ऐनवेळी विजयनी माघार घेतल्यामुळे ममतादीदींना रिकाम्या हाताने परतावे लागले. त्यावेळी तृणमूलची रणनीती आखणाऱ्या प्रशांत किशोर यांनी विजयना तृणमूलमध्ये या, नाही तर तुम्हाला निवडणूक हरावी लागेल, असा इशारा दिला होता. कदाचित याचाच हा भाग म्हणून तृणमूलने लुईझिनचा पर्याय निवडला असावा, असे बोलले जात आहे.

नव्या समीकरणांचा भाजपला कितपत लाभ?

विजय आणि लुईझिन रिंगणात उतरल्यास मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा भाजपचे दामू नाईक यांना होऊ शकतो, असे त्यांना वाटत असावे. पण हे करताना त्यांनी फातोर्डा मतदारसंघाचा अभ्यास केला आहे, दिसत नाही. फातोर्ड्यात लुईझिनना अजिबात स्थान नाही. सद्यस्थिती पाहता ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले जाऊ शकतात. तेथे त्यांची अनामत रक्कमही जप्त होऊ शकते. यामुळे लुईझिन-विजयच्या (Vijay Sardesai) लढतीचा फायदा भाजपला होईल की काय, हे सांगता येणे कठीण आहे. पण तृणमूलने तसा प्रयत्न केला आहे, एवढे मात्र निश्चित. हे सगळे राजकारण लुईझिनच्या विजयाकरिता नसून विजयच्या पराभवाकरिता आहे, हे स्पष्ट होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT