Goa BJP: मिलिंद नाईक यांना सरकारचा आशीर्वाद

नाईक यांना मुरगावमधून उमेदवारी देण्यासाठीच हे प्रकरण चौकशीविना दडपल्याचा आरोप काँग्रेसने केला
Milind Naik
Milind NaikDainik gomantak
Published on
Updated on

पणजी: भाजपचे माजी मंत्री मिलिंद नाईक यांच्या विरोधात काँग्रेसचे नेते संकल्प आमोणकर यांनी दाखल केलेले प्रकरण पोलिसांवर दबाव आणून भाजप सरकारने बंद केल्याने काँग्रेसने त्या कृतीचा निषेध केला. या लैंगिक अत्याचार प्रकरणाची विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) चौकशी व्हावी, यासाठी उच्च न्यायालयात जाऊ. नाईक यांना मुरगावमधून उमेदवारी देण्यासाठीच हे प्रकरण चौकशीविना दडपल्याचा आरोप काँग्रेसने केला. (government is backing Milind Naik)

Milind Naik
गोव्यातील उमेदवार निश्चितीसाठी भाजपची दिल्लीत खलबतं

पणजीतील काँग्रेस (Congress) कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे उपाध्यक्ष तथा प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांच्यासोबत प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्ष बीना नाईक उपस्थित होत्या. पणजीकर म्हणाले की, मिलिंद नाईक (Milind Naik) यांना सेक्स स्कँडल प्रकरणातून वाचवण्यासाठी भाजपने सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला. काँग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी महिला पोलीस (Goa Police) ठाण्यात दाखल केलेली तक्रार बंद करणे म्हणजे तिकीट जाहीर करण्याच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने रचलेले हे कटकारस्थान आहे.

नाईक यांना संरक्षण देण्याच्या उद्देशाने हे नाटक गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार रचले आहे. नाईक यांचे सेक्स स्कँडल उघड करणाऱ्यांना त्रास दिला जात आहे. पीडितेने आरोप फेटाळल्याच्या आधारे पोलिसांनी तक्रार बंद केली आहे. याप्रकरणी पोलिस उपअधीक्षकांनी काय चौकशी केली? तक्रारदाराला त्यांनी चौकशीसाठी बोलावले नाही. कारण हे प्रकरण निकालात काढण्यासाठी पोलिसांवर मुख्यमंत्र्यांकडून दबाव होता, असा आरोप पणजीकर यांनी केला. पीडित महिलेवर मिलिंद नाईक आणि भाजप सरकारने हे प्रकरण बंद करण्यासाठी दबाव आणला आहे. हे प्रकरण बंद करण्यासाठी पीडितेला लाखो रुपये देण्यात आले, असेही ते म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com