TMC  Dainik Gomantak
गोवा

TMC Star Campaigners: टीएमसीतर्फे 30 स्टार प्रचारकांची यादी जाहीर, पण...

तृणमूल कॉंग्रेसतर्फे 30 स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे,पण निवडणूक आयोगाने प्रचारवारील निर्बंध वाढवले आहेत.

दैनिक गोमन्तक

TMC Star Campaigners: देशातील 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. गोव्यातील निवडणुका 14 फेब्रुवारीला एका टप्प्यात पार पडणार आहेत. अवघे मोजकेच दिवस शिल्लक असल्यामुळे सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय तसेच स्थानिक पक्ष आपापले उमेदवार जाहीर करत आहेत. यातच तृणमूल कॉंग्रेसतर्फे (Trinamool Congress) आपल्या 'स्टार प्रचारकां'ची (Star Campaigners) यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 30 जणांचा समावेश आहे.

या स्टार प्रचारकांच्या यादीत पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी (Mamata Banejree), अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee), यशवंत सिन्हा, लुईझिन फालेरो, बाबूल सुप्रियो, किरण कांदोळकर, लियांडर पेस, कीर्ती आझाद, चर्चिल आलेमाव (Churchill Alemao) अशा दिग्गज व्यक्तींचा समावेश आहे. त्यातच आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission) नवीन घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या प्रचाराची रॅली आणि सभांवरील निर्बंधांत अजून वाढ केली आहे. आता हे निर्बंध 31 जानेवारीपर्यंत लागू असणार आहेत.

एकीकडे टीएमसीने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे, तर दुसरीकडे निवडणूक आयोगाने प्रचारवरील निर्बंधांचा कालावधी वाढवला आहे. त्यामुळे टीएमसी नेमके कशाप्रकारे आपला प्रचार करणार आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT