Tiswadi  Dainik Gomantak
गोवा

Tiswadi News : पर्यावरण टिकवून ठेवणे काळाची गरज : आशिष प्रभुदेसाई

Tiswadi News : रायबंदर येथील बालभारती विद्यामंदिरात गोमन्तकतर्फे वृक्षारोपण

गोमन्तक डिजिटल टीम

Tiswadi News :

तिसवाडी, रायबंदर येथील बालभारती विद्यामंदिर शाळेत जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. गोमन्तककडून यानिमित्त वृक्षारोपण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी गोवा शालान्त मंडळाचे माजी अध्यक्ष पांडुरंग नाडकर्णी, प्राध्यापक आशिष प्रभुदेसाई, बालभारती विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका एपोलोनिया फर्नांडिस, गोमन्तकचे महाव्यवस्थापक विजू पिल्ले, व्यावसायिक दिनेश सिनारी, गोमन्तकचे वितरण व्यवस्थापक संजय पाटील आणि पीटीए अध्यक्ष संजय सावंत उपस्थित होते.

वृक्षारोपण कार्यक्रमानंतर प्रा. आशिष प्रभुदेसाई यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाबद्दल सादरीकरण केले. पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी आम्ही जागरूक राहण्याची आवश्यकता प्रभुदेसाई यांनी सांगितली. आज ग्लोबल वॉर्मिंग वाढत असून यासाठी पर्यावरण टिकून ठेवणे काळाची गरज आहे, असे प्रभुदेसाई म्हणाले.

यावेळी बोलताना पांडुरंग नाडकर्णी म्हणाले की, आज तुम्ही विद्यार्थ्यांनी पुढील ८७ वर्षासाठी गोव्यातील पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे. हे जग आपले असून त्याचे जतन करण्याची गरज आहे. कार्यक्रमानंतर विजू पिल्ले यांनी आशिष प्रभुदेसाई, पांडुरंग नाडकर्णी, दिनेश सिनारी, एपोलिनिया फर्नांडिस आणि संजय सावंत यांचा स्मृतीचिन्ह प्रदान करून आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोमन्तकचे भारत पोवार यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT