Tiswadi Agriculture  Dainik Gomantak
गोवा

Tiswadi Agriculture : ‘खाजन शेती’साठी टेनंट संघटनेत लोकशाही आवश्यक; सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

Tiswadi Agriculture :

तिसवाडी, नेवरा खाजन शेतीचा विषय नदीचे अतिरिक्त पाणी घेऊन शेती बुडवण्यापासून ते टेनंट संघटनेत शेतकऱ्यांचे वारस म्हणून बनावट नावांपर्यंत पोहोचला आहे.

खाजन शेती टिकवून ठेवण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करण्याची वेळ आली असून नेवरा ओ ग्रांड टेनंट संघटनेचे सुमारे ८०० सदस्यांचे वारस शोधून त्यांना संघटनेचे सदस्यत्व दिले पाहिजे. ही प्रक्रिया केल्यास संघटनेची निवडणूक प्रक्रियेत एकाधिकारशाही संपणार आणि लोकशाही पुन्हा प्रस्थापित होणार, असे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.

तिसवाडी मामलेदारांनी शेतकऱ्यांचे वारस असलेल्यांची नावे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असली तरी त्यात घोळ झाला असून बनावट नावे दाखल केल्याची लेखी तक्रार मामलेदारांकडे करण्यात आली आहे. नेवरा ओ ग्रांड टेनंट संघटनेत सुमारे ८०० शेतकरी सदस्य होते; परंतु त्यांच्या वारसांची नावे दाखल न झाल्याने सुमारे ४० सदस्य झाले आहेत.

या सदस्यांची मक्तेदारी संपण्यासाठी सरकारने ही प्रक्रिया आपल्या हातात घ्यावी. घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून सदस्यांचे वारस शोधून काढावेत. वारस शोधून काढल्यानंतर एका कुटुंबात एकाहून अधिक वारस मिळाले, तरी त्यांना एकच मत घ्यावे. ही प्रक्रिया केल्यास याचा लाभ निवडणुकीत पारदर्शक पद्धतीने संघटना निवडण्यात होईल, असे शेतकऱ्यांचे मत आहे.

खाजन शेती पूर्ववत करण्यासाठी प्रथम टेनंट संघटनेत लोकशाही आणण्याची गरज आहे. सध्या संघटनेत काहीजणांची एकाधिकारशाही सुरू असून नेहमी दोन गटांमध्ये सत्तांतर होत आहे. त्यामुळे खाजन शेतीशी निगडित मूळ समस्यांचे निवारण होत नाही. सरकारने खासकरून महसूल खात्याने संघटनेतील सर्व सदस्यांचे वारस शोधून काढण्याची मोहीम सुरू करावी.

- रामराव वाघ, समन्वयक, खाजन ॲक्शन समिती

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Taxi: ..हे तर सरकारचे कारस्थान! जीएसटी नोटीसींवरुन टॅक्सीमालक नाराज

Goa University: विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव! गोवा फॉरवर्डचा हल्लाबोल; शिष्‍टमंडळाशी चर्चा होणार

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Goa Marine Projects: ..गोव्यात अखेर '23 प्रकल्‍पांची' मान्यता रद्द! रोजगार तसेच कोटींच्‍या गुंतवणुकीवर पाणी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

SCROLL FOR NEXT