Tiswadi Accident  Dainik Gomantak
गोवा

Tiswadi Accident : बांबोळी येथे दुचाकी अपघातात दोघे ठार

Tiswadi Accident : ताबा सुटल्यामुळे वीजखांबाला धडक

गोमन्तक डिजिटल टीम

Tiswadi Accident :

तिसवाडी, राज्यात अपघातांचे सत्र सुरूच असून आज बांबोळी झालेल्या स्वयंअपघातात दुचाकीवरील दोघांचा बळी गेला. चालकाचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असून स्वयंअपघात अशी नोंद आगशी पोलिसांनी याप्रकरणी केली आहे.

हा अपघात सायंकाळी ४.१० वाजता घडला. दुचाकीस्वार अच्युत रंजन गोगोई (वय १९ वर्षे, मूळ आसाम) हा आणि सहचालक पापू गोगोई दोघे मिळून जीए-०६-जी २३५१ या क्रमांकाच्या दुचाकीवरून पणजीच्या दिशेने जात होते.

बांबोळी-शिरदोन येथील उड्डाण पुलावर अचानक दुचाकीवरील ताबा सुटून त्याने थेट बाजूच्या वीजखांबाला जोरदार धडक दिली. नंतर दुचाकीने दुभाजकाला ठोकर देत पुढे मडगावच्या दिशेने जाणाऱ्या बसलाही धडक दिली.

या दुर्घटनेत गोगोई हा जागीच ठार झाला, तर सहचालक गंभीर जखमी झाला. त्याला गोमेकॉत दाखल करण्यात आले; मात्र, उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मावळली.

२०२४ साल सुरू होऊन रविवारी १०४ दिवस पूर्ण झाले. या १०४ दिवसांत गोव्‍यातील रस्‍त्‍यांवर तब्बल ७५ जणांचे बळी गेले असून त्‍यापैकी ४६ बळी हे दुचाकीस्‍वारांचे आहेत.

त्यामुळे पुन्हा एकदा राज्याची प्रतिमा ‘किलर स्‍टेट’ अशी झाली आहे. ही बाब अतिशय चिंताजनक असून वाढत्‍या अपघातांवर नियंत्रण आणण्‍यासाठी राज्‍य सरकारने तातडीने उपाय योजण्‍याची गरज व्‍यक्‍त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT