Tillari canal cracks Dainik Gomantak
गोवा

Tillari Canal: ‘तिळारी’च्या मुख्य कालव्याच्या काँक्रिटला तडे! अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष; पाणी वाटप समित्या नावापुरत्याच

Tillari Main Canal Pernem: धरण बांधकामात गोवा सरकारची ७४ टक्के भागीदारी आहे. त्याबदल्यात गोवा सरकारला कालव्यातून शेतकऱ्यांसाठी फक्त पाणीपुरवठा करण्याची तरतूद आहे.

Sameer Panditrao

मोरजी: शेकडो कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या पेडणे तालुक्यातील हणखणे येथील तिळारीच्या मुख्य कालव्याच्या काँक्रिटला तडे गेले असताना त्याकडे अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष का करण्यात येते, असा प्रश्न पेडणेतील काँग्रेसचे नेते ॲड. जितेंद्र गावकर यांनी उपस्थित केला आहे.

दुसरीकडे, तिळारी धरणाच्या परिक्षेत्रातील खानयाळे येथील गावकऱ्यांच्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी तिळारी धरणाजवळील दगडखाणींतील काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. याबद्दल गावकर यांनी समाधान व्यक्त केले.

या धरण बांधकामात गोवा सरकारची ७४ टक्के भागीदारी आहे. त्याबदल्यात गोवा सरकारला कालव्यातून शेतकऱ्यांसाठी फक्त पाणीपुरवठा करण्याची तरतूद आहे. गोव्यातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी गोवा सरकारकडून शेकडो कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

शिवाय गोव्यातील तिळारी कालव्यांची देखभाल आणि दुरुस्ती करण्याची संपूर्ण जबाबदारी जलस्रोत खात्यातील अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे. याबरोबरच जलस्रोत खात्याकडून गावागावांत स्थापन केलेल्या पाणी वाटप समितीकडेही सोपविण्यात आली आहे. या पाणी वाटप समित्यांची जबाबदारी नावापुरतीच उरली आहे. जलस्रोत खात्यातील तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या मते पाणी वाटप समितीला काडीचीही किंमत उरली नाही.

प्रवीण आर्लेकरांना टोला!

जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या विधानसभेत सोडविण्यासाठी पेडणेतील जनतेने लोकप्रतिनिधी म्हणून आमदार प्रवीण आर्लेकर यांची निवड केली आहे. त्यांच्याकडून लोकांच्या फार अपेक्षा आहेत. मात्र, लोकांच्या समस्या सोडवण्या आर्लेकर विसरले की काय, असा टोला ॲड. जितेंद्र गावकर यांनी यानिमित्त हाणला आहे.

जड वाहतुकीमुळे नुकसान

खानयाळे येथील लोकांच्या तक्रारीकडे तिळारी कालव्याशी संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याबद्दल तेथील लोकांनी उपोषणास सुरुवात केली होती. याची दखल घेत सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी तिलारी धरणाजवळील दगडखाणी आणि क्रशिंग युनिट्स तसेच वाहतूक थांबवण्याचे निर्देश जारी केले आहेत.

त्याच्या उलट हणखणे येथील श्री भराडी पाणी वाटप समितीकडून गोपाळ पुंडलिक नाईक यांनी हणखणेतील तिळारी कालव्याशेजारील मुख्य रस्त्यावरून जड वाहतूक सुरू असल्याने कालव्याच्या काँक्रिटला तडे गेले असून तिळारी कालव्याला धोका निर्माण झाला आहे, अशी लेखी तक्रार तिळारीशी संबंधित अधीक्षक अधिकारी शिरोडकर यांच्याकडे केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli Viral Post: विराट कोहलीचा दोन वर्षांनंतर मोठा निर्णय; सोशल मीडियावरील 'त्या' पोस्टनं खळबळ!

Mandovi Bridge: मांडवी पुलावर 'नो एन्ट्री'! 11 जानेवारीला 'या' वेळेत नव्या आणि जुन्या पुलावरून वाहतूक पूर्णपणे बंद

Raia Fire News: ..आणि बघता बघता डोंगरच पेटला! राय येथील घटना; अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न

Tara Sutaria Breakup: तारा सुतारिया आणि वीर पहाडियाचे ब्रेकअप? 'त्या' व्हायरल व्हिडिओनंतर नात्यात दुरावा Watch Video

Goa Nature Conference 2026: निसर्गाशी नाते करा घट्ट! गोव्यात रंगणार पहिले निसर्ग संमेलन; तारीख, वेळ जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT