तिलारी कालवा (File Photo) Dainik Gomantak
गोवा

Dhargal : धारगळ परिसरात तिळारी कालव्याला भगदाड; लाखो लिटर पाणी वाया

शेताला तलावाचे स्वरूप; जलसिंचन खात्याचे दुर्लक्ष

दैनिक गोमन्तक डिजिटल

Dhargal : तिळारी प्रकल्पातील पेडणे तालुक्यात येणारा कालवा ठिकठिकाणी झिरपत असल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. धारगळ-दाडाची वाडी परिसर, आयुष हॉस्पिटल परिसर, सुकेकुळण परिसर तोरसे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तिळारी कालव्यांना भगदाडे पडली असून ठिकठिकाणी पाणी वाया जात आहे.

शेताला तलावाचे स्वरूप आले आहे. चिऱ्यांच्या खाणी तुडुंब भरलेल्या आहेत, असे चित्र धारगळ परिसरात आणि सुकेकुळण भागात दिसून येत आहे. याकडे जलसिंचन खात्याचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.

राज्य सरकारने महाराष्ट्र सरकारबरोबर करार करत असताना तिळारी येथे पाणी प्रकल्प उभारला आणि त्यावेळी ठरले होते की, 75 टक्के पाणी हे गोवा सरकारला आणि 30 टक्के पाणी महाराष्ट्र सरकारला आणि तशा प्रकारे 75 टक्के खर्च हा गोवा सरकारने केला होता.

तिळारी प्रकल्पातून कालवे बांधत असताना ते पाणी महाराष्ट्रातून पेडणे तालुक्यात आणण्यासाठी पाटबंधारे अंतर्गत ठिकठिकाणी कालवे उभारले. परंतु हे कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे अनेक ठिकाणी कालव्यांना गळती लागलेली आहे. यातून पाणी वाया जात असल्यामुळे कधी-कधी पाणी टंचाईही निर्माण होते.

सरकारला लेखी निवेदने

तोरसे-राजवेल येथील तिळारी कालव्यालाही ठिकठिकाणी गळती लागली आहे. या पाण्यामुळे याही परिसरातील घरांना धोका निर्माण झाल्याने वेळोवेळी पेडणे तालुका विकास समितीने आवाज उठवलेला आहे. शिवाय लेखी निवेदनेही सरकारला सादर केलेली आहेत.

परंतु पेडणे तालुक्यात जे-जे कालवे ज्यांच्या बागायती शेतीच्या जवळून गेले आहेत, ते कालवे नादुरुस्त आहेत. त्यांची दुरुस्ती करण्यास आजपर्यंत जलसिंचन विभागाला मुहूर्त का सापडत नाही, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

सुकेकुळणचे तलावात रूपांतर

धारगळ-सुकेकुळण या ठिकाणी कधीच पाणी नसते. हा कोरडा भाग म्हणून त्याला सुकेकुळण असे संबोधले जाते. परंतु सध्या जर या परिसरात नजर मारली तर पाणीच पाणी असल्याचे चित्र दिसून येते. हे पाणी कालव्यामधून सोडले जाते की कालवे फुटलेले आहेत. त्यामुळे जलसिंचन खाते किती सजग आहे हे आता समोर येत आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Gopal Khemka Murder: बिहार हादरले, गोळ्या घालून प्रसिद्ध उद्योगपती गोपाल खेमका यांची हत्या

Goa News Live Updates: महिना उलटला पण कचरा तसाच

Ramayana Bollywood: रामायणाची 'स्टार कास्ट' उघड! रणबीर कपूर, साई पल्लवी सोबत 'हे' कलाकार साकारणार महत्वाच्या भूमिका

SCROLL FOR NEXT